मुल – शहरात सामाजिक उपक्रमांना नेहमीच प्राधान्य दिले जाते. याच भावनेतून श्री साईंच्या कृपेने व समाजहिताच्या उद्देशाने थंडगार पाणपोई सुरू करण्याचा सुंदर उपक्रम हाती घेण्यात आला आहे. मुल नगर परिषदचे सक्रिय सदस्य श्री विवेक मूत्यलवार व श्री साई मित्र परिवार मुल चे सदस्य यांच्या हस्ते पाणपोईचे शुभारंभ करण्यात आले, वाढत्या उन्हाळ्यात नागरिकांना स्वच्छ व थंड पिण्याचे पाणी सहज उपलब्ध व्हावे, या हेतूने हा उपक्रम सुरू होत आहे.
या पवित्र कार्यासाठी साईश्रद्धा चिल्ड वॉटर आणि साईश्रद्धा ऑटो डील यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. त्यांच्या या उदात्त पुढाकारामुळे शहरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. समाजाप्रती असलेली जबाबदारी ओळखून त्यांनी केलेली ही मदत खरोखरच प्रेरणादायी आहे.
तसेच या उपक्रमासाठी पंकज विजय महाजनवार यांचे मार्गदर्शन व सहकार्य उल्लेखनीय आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे हा उपक्रम साकार होत असून, शहरात सेवाभावाची नवी प्रेरणा निर्माण होत आहे.
या कार्यातून स्पष्ट होते की, साईश्रद्धा चिल्ड वॉटर मार्फत थंड पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच, साईश्रद्धा ऑटो डील द्वारे विविध वाहनांच्या खरेदी-विक्रीची सेवा दिली जाते. या दोन्ही उपक्रमांचा संगम म्हणजेच समाजसेवा आणि व्यवसाय यांचा सुंदर मिलाफ आहे.
मुल शहरातील सर्व नागरिकांनी या पाणपोईचा लाभ घ्यावा व अशा सामाजिक कार्यांना प्रोत्साहन द्यावे, अशी विनंती साई श्रद्धा चिल्ड वॉटर मुल श्री साई मित्र परिवार मुल यांनी जनतेला केली आहे.





