भारतीय जनता पक्षातर्फे मुल तालुक्यातील गुणवंताचा सत्कार

0
68

मुल:- नुकताच दहावीचा बोर्डचा निकाल लागला असून मुल तालुक्यातील विद्यार्थ्यांनि कुठेही मागे न राहता दैदीप्यमान यश संपादन केले आहे. कु.अवनी सुहास पुपलवार या विद्यार्थीनीने मुल तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावत 97.60 टक्के गुण संपादन केले, आज भारतीय जनता पक्षातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी जाऊन पुष्पगुच्छ, भेटवस्तू आणि पेढे भरवत अभिष्टचिंतन करण्यात आले, सदर शिष्टमंडळात भाजप मुल तालुका अध्यक्ष चंदू मारगोनवार, शहर अध्यक्ष प्रवीण मोहूर्ले, भाजप नेत्या किरण कापगते, माजी नगरसेवक मिलिंद खोब्रागडे, किशोर कापगते, नगरसेविका अश्विनी निकोडे, प्राची आक्केवार, महासचिव  जितू टिनगुसले, राकेश ठाकरे, युवराज चावरे, आनंद आक्केवार आणि कार्यकर्ते उपस्थित होते या प्रसंगी उपस्थितांनी संविधान बोर्ड देत गुणवंतांचा सत्कार केला.

Previous articleनप चे बंद जलतरण तलाव सुरू करा- जलतरण संघटनेची मागणी विद्यार्थ्यांच्या सुट्ट्यांमध्येही दुर्लक्षित आहे जलतरण तलाव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here