सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या सूचनेनुसार भाजप शिष्टमंडळाची शिष्टाई  गॅस सिलेंडर आता होणार तारखेनुसार वाटप

0
335

मुल शहरातील सिलेंडर वाटप प्रक्रियेत मागील काही दिवसांपासून प्रचंड घोळ झाला असून एक एक महिन्यांपासून ओटीपी येऊनही ग्राहकांना सिलेंडर मिळत नव्हते, अनेक नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आपला पॉवर दाखवत सिलेंडर मिळवून देणे, पैसे देऊन सिलेंडर मिळाले अशे आरोप होणे, रांगेत लागूनही सिलेंडर न मिळणे अश्या अनेक तक्रारी ग्राहकांकडून प्राप्त होत होत्या, ग्राहकांना अनेक दिवस हेलपाट्या घालूनही सिलेंडर मिळत नव्हते, अनेक सामाजिक संघटना , राजकीय पक्ष यांनी सुद्धा तहसील कार्यालयात या बाबद निवेदन सादर केले, भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळाने सुद्धा शहर अध्यक्ष प्रवीण मोहूर्ले यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयात निवेदन दिले, जनतेने आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या निदर्शनास पण ही बाब आणून दिली, आमदार मुनगंटीवार यांनी तहसीलदार मोरे मॅडम यांना याबाबतीत सूचना केल्या , आज तहसीलदार मृदुला मोरे यांनी आमदार मुनगंटीवार यांच्या सूचनेनुसार गॅस एजन्सी धारकांची बैठक बोलावत काही स्पष्टपणे सूचना दिल्या , बैठकीत खालील प्रमाणे गोष्टी ठरल्या

1. सिलेंडर वाटप हे दर बुधवारी क्रीडा संकुलात तर इतर दिवशी महात्मा फुले आठवडी बाजारात वाटप होईल

2. बुकिंग केलेल्या तारखेनुसार रोज सायंकाळी एजन्सी धारक तहसील कार्यालयाला साधारण 400 सिलेंडर धारकांची यादी देईल

3. सदर यादीनुसारच दुसऱ्या दिवशी वाटप होईल,

4. यादीत नाव नसलेल्या ग्राहकांनी गर्दी करायची नाही, ज्यांचे यादीत नाव असेल त्यांचे ओळखपत्र व इतर संबंधित कागदपत्रे बघूनच वाटप होणार आहे

5. वाटप करतांना पोलीस प्रोटेकशन राहणार असून कुणीही गडबड न करण्याचे आवाहनही प्रशासनाने केले आहे

6. या बाबतीत तहसील कार्यालय एक प्रेस नोट काढून जनतेला सूचना देणार असल्याचे कळते

सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी पुरवठा अधिकाऱ्यांना मुल साठी कोटा वाढवून देण्याच्या सूचना सुद्धा दिल्या असून लवकरच सिलेंडर ची प्रतीक्षा संपणार आहे असे दिसते.

Previous articleविद्यार्थ्यांना गृहपाठ मोबाईलवर देऊ नये नगराध्यक्षा एकता समर्थची मागणी
Next articleशैक्षणिक शुल्कासाठी विद्यार्थ्यांना परीक्षेपासुन वंचित ठेवु नये: नगराध्यक्ष एकता समर्थ यांचे शिक्षकांना निर्देश शैक्षणिक संस्थेच्या मुख्याध्यापकांची नगर पालीकेत आढावा सभा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here