विद्यार्थ्यांना गृहपाठ मोबाईलवर देऊ नये नगराध्यक्षा एकता समर्थची मागणी

0
70

मुल:- 20 एप्रिल 2026 ला नगरपरिषद तर्फे मूल शहरातील संपूर्ण शाळा महाविद्यालयाच्या मुख्याध्यापकांची मीटिंग घेऊन शिक्षकांना सूचना करण्यात आल्या.

विद्यार्थ्यांना गृहपाठ मोबाईलवर देऊ नये अशी मागणी नगराध्यक्ष एकता समर्थ यांनी केली.जेणेकरून पालकांना मोबाईल देण्याची गरज पडणार नाही. शाळेच्या बाहेर मुला मुलींचा घोडका होऊ देणार नाही याचे दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले. खाजगी शाळेनी दरवर्षी शुल्क वाढवू नये. खाजगी शाळेतील अभ्यासक्रम दरवर्षी बदलला जातो. तो बदलला जाऊ नये. शुल्क विषयी विद्यार्थ्यांना कुठलाही त्रास देऊ नये त्याविषयी विद्यार्थ्यांच्या पालकांशी बोलावं. अशा सूचना यावेळी देण्यात आल्या. उपस्थित सर्व शिक्षकांना संविधानची प्रतिमा देण्यात आली. २४ शाळेपैकी २२ शाळेतील शिक्षक उपस्थित होते. येथे उपस्थित नगराध्यक्ष एकता प्रशांत समर्थ, उपाध्यक्ष राकेश रत्नवार, बांधकाम सभापती प्रशांत समर्थ, गटशिक्षण अधिकारी गुंजनवार मॅडम, शिक्षण व क्रीडा सभापती ललिता फुलझले, बालकल्याण सभापती नलिनी आडपवार, उपसभापती समीक्षा कडस्कर, नगरपरिषदचे कर्मचारी विनोद येणुरकर, नगरसेवक , नगरसेविका शहरातील मुख्याध्यापक शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleचंद्रपूरच्या प्रगतीचा पाया पारदर्शक आणि लोकाभिमुख प्रशासनामुळेच भक्कम; मुनगंटीवार यांनी व्यक्त केला विश्वास

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here