शैक्षणिक शुल्कासाठी विद्यार्थ्यांना परीक्षेपासुन वंचित ठेवु नये: नगराध्यक्ष एकता समर्थ यांचे शिक्षकांना निर्देश शैक्षणिक संस्थेच्या मुख्याध्यापकांची नगर पालीकेत आढावा सभा

0
49

मूल: वर्षेभर शिक्षण घेतल्यानंतर ऐन परिक्षेच्यावेळी शैक्षणिक शुल्क न भरल्याचे कारण पुढे करून परिक्षेपासुन वंचित ठेवण्याचा प्रकार मूल शहरात होवु नये असे निर्देश मूल नगर पालीकेच्या अध्यक्षा एकताताई प्रशांत समर्थ यांनी दिल्या, त्या नगर पालीकेने आयोजीत केलेल्या शैक्षणिक संस्थांच्या आढावा सभेत बोलत होत्या.

यावेळी मूल नगर पालीकेचे उपाध्यक्ष राकेश रत्नवार, बांधकाम सभापती प्रशांत समर्थ, गटशिक्षण अधिकारी गुंजनवार, शिक्षण व क्रीडा सभापती ललीता फुलझले , महिला व बालकल्याण सभापती नलिनी आडपवार, उपसभापती समीक्षा कळस्कर, नगरसेविका ज्योती चटारे, सुशिला खोब्रागडे, काजल धारणे, अर्चना कामडी उपस्थित होते.

मूल शहरात गेल्या काही दिवसात शाळकरी मुलींवर अत्याचार होत असल्याची बाब पुढे आली, याअनुषंगाने मूल नगर पालीकेने मूल शहरातील सर्व शाळा, महाविद्यालयाच्या मुख्याध्यापकांची सभा नगर पालीका सभागृहात पार पडली. यावेळी नगराध्यक्ष एकता समर्थ यांनी उपस्थित मुख्याध्यापक आणि त्यांच्या प्रतिनिधीना निर्देश दिले. यावेळी त्या म्हणाल्या की, शैक्षणिक शुल्क भरण्यास पालकांना कधी विलंब होत असल्यास पालकाशी बोलुन त्यावर तोडगा काढावे मात्र परिक्षेपासुन एकाही विद्यार्थ्यांना वचित ठेवु नये, विद्यार्थ्यांना मोबाईलची गरज पडणार नाही, अशापध्दतीने विद्यार्थ्यांना गृहपाठ देण्यात यावे, शाळा परिसराच्या काही अंतरापर्यंत विद्यार्थ्यांचा घोडका जमा होणार नाही याची काळजी घेण्यात यावी व त्यानुसार एखादया कर्मचाÚयांची नियुक्ती करण्यात यावी, खाजगी शैक्षणिक संस्थेनी दरवर्षी शैक्षणिक शुल्कांमध्ये वाढ करू नये, व दरवर्षी शाळेने अभ्यासक्रम बदलवु नये असे निर्देशही नगराध्यक्ष एकताताई समर्थ यांनी दिले

यावेळी शिक्षक आणि त्यांच्या प्रतिनिधीना संविधानाची प्रतिमा भेट देण्यात आली. आढावा सभेला नगर पालीकेचे कार्यालयीन अधिक्षक विनोद येनुरकर, आणि कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.

Previous articleसुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या सूचनेनुसार भाजप शिष्टमंडळाची शिष्टाई  गॅस सिलेंडर आता होणार तारखेनुसार वाटप

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here