वर्हाड दूत न्यूज नेटवर्क
खामगाव : येथील सतीफैल भागातील विवाहित युवकाने घरासमोर राहणाऱ्या युवतीस पळवून नेवून त्याच्या पत्नीने स्वत: च्या पतीसोबत लग्न लावल्याची घटना स्थानिक सतीफैल भागात उघडकीस आली .
स्थानिक सतीफैल भागात आपल्या मावशी च्या घरी राहणाऱ्या २२ वर्षीय युवतीला आरोपी व त्याच्या पत्नीने फुस लावुन पळविले व त्या युवतीसोबत आपल्या पतीचे लग्न लावुन दिले त्या युवतीने शिवाजीनगर पोस्टेला तक्रार दिली की , तिच्या शेजारी राहणारे राजेश साहेबराव जाधव व त्याची पत्नी सौ. मैना राजेश जाधव यांनी संगनमत करून २२ ऑगस्ट ते ७ डिसेंबर दरम्यान मला वाहनामध्ये बसवून तालुक्यातील किन्ही महादेव मंदिरात नेवून सौ . मैना जाधव हिने तिचा पती राजेश जाधव याचेसोबत माझे लग्न लावले . नंतर मला पुन्हा माझ्या घरी सोडून दिले व दोघांनी ‘ याबाबत कोणालाही काहीही सांगितल्यास जीवे मारु ‘ अशी धमकी दिली . अशा तक्रारीवरून शिवाजीनगर पोलिसांनी राजेश साहेबराव जाधव व त्याच्या पत्नीविरूध्द कलम ३६६ , ३५४ , अ , ४१७ , ५०६ भादंविनुसार गुन्हा दाखल करून राजेश जाधव यास ताब्यात घेतले आहे .