मूल:-
शिवसेनेचे प्रमुख नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार पूर्व विदर्भसंघटक किरण पांडव व विधानसभा आमदार व पक्ष सचिव मनीषा कायंदे यांच्या मार्गदर्शनाखाली काश्मीर येथील पहलगाम इथे दहशतवादीनी केलेल्या भ्याड हल्याचा आज शिवसेना महिला आघाडी मुल जिल्हा चंद्रपुर तर्फे गांधी चौक मुल येथे जाहिर निषेध करण्यात आला. मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांना श्रद्धांजली देण्यात आली, शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख चंद्रपुर भारती राखडे, यांच्या नेतृत्वा घेण्यात आले. याठिकाणी प्रामुख्याने उपस्थित महिला आघाडी तालुकाप्रमुख, शालीनी खैरे,उपतालुका प्रमुख वंदना टिकले, शाखा प्रमुख साधना नामेवार,माधुरी बलगेलवार,शालु उराडे,अपेक्षा वंगलवार,शितल कंदीकुरवार, रिना बगडे ,रंजना बगडे तसेच युवासेना उपतालुका प्रमुख आशिष टिकले,सुनील राखडे,संजय खैरे,आदींची उपस्थिती होती.





