मुल शहरातील तथा तालुक्यातील समस्त जनतेला जाहीर आव्हान करण्यात येत आहे की‚ मुल तालुक्यात एकही अधिकृत गॅस एजंसी नसल्यामुळे सद्या सुरु असलेला गॅस सिलेंडर तुटवडा‚ गॅस पुरवठ्याच्या तांत्रीक अडचनीमुळे नागरीकांना होत असलेला नाहक त्रास या विरोधात‚ प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस *माननीय संतोषसिंह रावत* तसेच मुल शहराच्या प्रथम नागरिक नगराधक्ष *मान.सौ एकता ताई समर्थ* यांच्या नेतृत्वात गुरुवार *दिनांक २३ एप्रील २०२६* ला सकाळी *१०-००* वाजता महिला काॅंग्रेस मूल तर्फे *गांधी चौक* मूल येथे धरणे/निदर्शने आंदोलन करण्यात येत आहे. तरी मुल शहरातील व तालुक्याकील समस्त जनतेने आपल्या न्याय हक्कासाठी, सुस्त प्रशासनाला जागे करण्यासाठी उपस्थित रहावे असे आवाहन मुल तालुका काॅग्रेस कमेटी‚ नगर परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती,नगर सेवक,बाजार समिती पदाधिकारी, यांनी केले आहे.
ज्या नागरिकांना गॅस सिलेंडरची अडचण आहे. त्या सर्वांनी उद्या सकाळी १० वाजता काँग्रेस भवन मूल येथे वेळेवर उपस्थित रहावे,ही विनंती.
महिला काॅंग्रेस कमेटी‚मूल





