भाजप नेते स्व. अनिलभाऊ साखरकर यांच्या निधनाने कार्यकर्त्यांमध्ये शोककळा | भारतीय जनता पार्टीकडून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण

0
227

मूल : भारतीय जनता पार्टी, मूल शहराच्या वतीने ज्येष्ठ भाजपा नेते स्वर्गीय अनिलभाऊ साखरकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या कार्याचा गौरवपूर्ण स्मरण केला.

स्व. अनिलभाऊ साखरकर यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक बांधणीत तसेच सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात मोलाचे योगदान दिले. पक्षाच्या विचारधारेप्रती त्यांची निष्ठा, कार्यकर्त्यांप्रती आत्मीयता आणि समाजसेवेची तळमळ कायम स्मरणात राहील, असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.

त्यांच्या निधनामुळे भारतीय जनता पक्षाने एक निष्ठावंत, कर्तव्यदक्ष आणि लोकाभिमुख नेतृत्व गमावले आहे. त्यांच्या कार्याचा आदर्श घेऊन कार्यकर्त्यांनी समाजहितासाठी कार्यरत राहावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

 

Previous articleआमदार सुधीर मुनगंटीवार यांचा रविवारी मुल येथे नागरी सत्कार समारंभ मालधक्का हटाव संघर्ष समितीचा पुढाकार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here