पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात काँग्रेस आक्रमक: मूल तहसीलदारांना राष्ट्रपतींच्या नावे निवेदन

0
189

मूल – केंद्र शासनाने मागील आठवड्याभराच्या कालावधीत पेट्रोल व डिझेलच्या किमतीमध्ये भरमसाठ वाढ केली आहे. त्यामुळे सर्वत्र महागाईचा भडका उडालेला आहे. केंद्र व राज्य सरकारच्या नियोजन शून्य कारभारामुळे पेट्रोल, डिझेल व गॅस इंधनाच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. गॅस सिलेंडरच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिक, गृहिणी, शेतकरी, कामगार व मध्यवर्गीय कुटुंबावर मोठा आर्थिक ताण निर्माण झाला आहे. त्याचप्रमाणे काही ठिकाणी गॅसचा कृत्रिम तुटवडा निर्माण झाल्याच्या तक्रारी देखील मोठ्या प्रमाणात सामोर येत आहे. गेल्या काही काळापासून जीवनावश्यक वस्तूंच्या किमती सातत्याने वाढत असून महागाई दिवसेंदिवस वाढत आहे. अश्या परिस्थितीत घरगुती गॅस सिलेंडर व इंधन दर वाढीमुळे सामान्य जनतेचे जगणे अत्यंत कठीण झाले आहे.केंद्र शासनाने जनतेला, बेरोजगारांना शेतकऱ्यांना, “अच्छे दिनाचे” स्वप्न दाखविले होते. ते धुळीस मिळविले आहे. मात्र प्रत्यक्षात वाढती महागाई व इंधन दरवाढ करून जनतेचा विश्वासघात केला आहे. डिझेल टंचाईमुळे शेतकऱ्यांना शेतीच्या मशागतीचे अडले आहेत. ही दरवाढ कमी करुन सामान्य जनतेला शेतकऱ्यांना दिलासा द्यावा यासाठी प्रदेश काँग्रेसच्या सूचनेनुसार मूल तालुका काँग्रेसच्या वतीने प्रदेश काँग्रेसचे महासचिव,माजी जी.प.अध्यक्ष संतोषसिंह रावत यांच्या मार्गदर्शनात मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले. *मागण्या*-* पेट्रोल,डिझेल,गॅस इंधन दरवाढ कमी करावी, * शेतकऱ्यांना शेती हंगामासाठी डिझेल साठा राखीव ठेवावा,* प्रत्येक गृहिणींना घरी गॅस सिलेंडर पुरवठा करावा, * दैनंदिन अत्यावशक वस्तूंची महागाई कमी करावी,इत्यादी महत्वाच्या मागण्या करण्यात आल्या आहेत. मागण्यांचे निवेदन देतांना सभापती राकेश रत्नावार,तालुका अध्यक्ष गुरु गुरनुले, शहर अध्यक्ष सुनील शेरकी,महिला तालुका अध्यक्ष रुपाली संतोषवार, शहर अध्यक्षा नलिनी आडपवार,विवेक मूत्यलवार, सभापती विलास कागदेलवार, नितीन गदेवार, बंडू गुरनुले, अतुल गोवर्धन,सभापती लीना फुलझेले, उपसभापती समीक्षा कळसकर, माजी सभापती वैशाली पुल्लावार, नगर सेवक ज्योती चटारे, चंद्रकांत चटारे, गणेश मेश्राम, प्रशांत उराडे, डेव्हिड खोब्रागडे,सुशीला खोब्रागडे, किसन शेरकी, तुकाराम गुरनुले, कृष्णा बोरेवार,संदीप वाढई, चित्तरंजन वाढई, बंडू वाकडे, आदी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous articleकिमान पिण्याचे पाणी द्या, स्वछता करा, आदरणीय सुधीरभाऊंच्या फंडातील कामे तात्काळ सुरू करा  अन्यथा आंदोलन- भारतीय जनता पक्षाचे अलटीमेंटम
Next articleआमदार सुधीर मुनगंटीवार यांचा रविवारी मुल येथे नागरी सत्कार समारंभ मालधक्का हटाव संघर्ष समितीचा पुढाकार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here