मुल येथील अल्पवयीन मुलींना फसवणाऱ्या नराधमांना पासचो कायद्याच्या अंतर्गत अटक झाली , चौकशी सुरू आहे. सदर प्रकार हा अत्यंत घृणास्पद , निंदनीय, संस्कृतीला काळिमा फासणारा आहे, परिसरात जनमानसात प्रचंड चीड निर्माण झाली आहे, प्रकरण हे गंभीर असुम सदर प्रकरण हे फास्टट्रॅक कोर्टात चालवून लवकरात लवकर नराधमांना शिक्षा झाली पाहिजे अशी तरतूद करण्याचे निवेदन प्रा सौ किरण कापगते आणि भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीने आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार याना दिले, आमदार मुनगंटीवार यांनी मागणी अतिशय योग्य असून मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना बोलून कारवाईचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले, प्रा किरण कापगते, महिला आघाडी मुल शहर अध्यक्ष श्रीमती मनीषा गांडलेवार, नगरसेविका प्राची आकेवार, अश्विनी निकोडे तसेच सौ किरण चौधरी , सौ रिना मसराम, आयेशा शेख व भाजप कार्यकर्त्या उपस्थित होत्या.





