वरोरा शहरातील मारडा रस्त्यालगत असलेल्या रवी कमल कोटक्स या जिनिंगला आज सायंकाळी साडेचार वाजता च्या सुमारास आग लागली आगीत लाखो रुपयांचा कापूस जळून खाक झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे
रवी कमल कोटेक्स जिनिंगमधील कापसाला अचानक आग लागली त्यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांनी आग विसरण्याचा प्रयत्न केला परंतु आग वाढत गेल्याने सर्वप्रथम वरोरा नगर परिषदेच्या अग्निशामक दलाला पाचरण करण्यात आले परंतु आग सारखी वाढत असल्याने आग आटोक्यात येत नव्हती त्यानंतर साई वर्धा पावर जि एम आर भद्रावती नगर परिषद वेस्टर्न कोल्ड फील्ड वनी नगरपरिषद ऑडनस फॅक्टरी चंद्रपूर व चंद्रपूर येथील तसेच बाजार समिती हिंगणघाट या अग्निशामक दलांना पाचारण करण्यात आले त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळाले तोपर्यंत जिनिंग मधील सर्व कापूस आगीत सापडला लाखो रुपयाचा कापूस जळायला चा अंदाज वर्तविला जात आहे.





