-अतिरिक्त सह जिल्हा व सत्र न्यायाधिशांचा निकाल
व-हाड दूत न्यूज नेटवर्क
अकोला: अल्पवयीन बालिकेवर बलात्कार करणा-या अकोला जिल्हयातील बार्शीटाकळी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अजनी बु. येथील आरोपी 23 वर्षीय युवकाला अतिरिक्त सह जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेसह 1 लाख 10 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. उल्हास पुंजाजी चव्हाण असे आरोपी युवकाचे नाव आहे.
या प्रकरणातील आरोपी उल्हास पुंजाजी चव्हाण वय 23 वर्ष याने 29 सप्टेंबर 2017 रोजी अजनी बु. येथे एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली होती. सदर युवकाविरुद्ध बार्शिटाकळी पोलिस स्टेशनला कलम 376 (2) (1) भादंवी , 3 (अ), 4 पोस्को अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणाचा तपास पिएसआय कडेखॉ पठाण यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. यामध्ये आज दि. 16 जुलैरोजी अकोला जिल्हा अतिरिक्त सह जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी झाली. मा. न्यायाधिश व्ही. डी. पिंपळकर यांनी निकाल देत आरोपीला दोषी ठरवून आजन्म कारावासासह 1 लाख 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. सरकारी पक्षातर्फे अधिवक्ता किरण खोत तर कोर्ट पैरवी म्हणून पोहेकाॅ प्रदिप पिंजरकर तर सिएमएस सेलचे अधिकारी म्हणून एएसआय प्रविण पाटील यांनी काम पाहिले.




