सरकारी जागेवर अतिक्रमण करणे भोवले

0
121

व-हाड दूत न्यूज नेटवर्क 
अकोला: तालुक्यातील ग्राम पंचायत गांधीग्राम येथील सरपंच सौ. सुषमा शरद ठाकरे, उपसरपंच सौ. श्रध्दा पंकज काठोळे व सदस्य शरद भगवान ठाकरे या तिघांना जिल्हाधिकारी यांनी अपात्र घोषीत केले.
गांधीग्राम येथील दीपक भास्कर अढाऊ व नंदकिशोर शंकर अढाऊ यांनी जिल्हाधिकारी अकोला यांचेकडे सरपंच सौ. सुषमा शरद ठाकरे त्यांचे पती शरद भगवान ठाकरे (ग्राम पंचायत सदस्य) व उपसरपंच सौ. श्रद्धा पंकज काठोळे यांचे विरुद्ध जिल्हाधिकारी अकोला यांचेकडे महाराष्ट्र ग्राम पंचायत अधिनियम १९५९ चे कलम १४-ज-१ नुसार प्रकरण दाखल केले होते, यामध्ये सरपंच पती शरद ठाकरे यांनी ग्राम पंचायत च्या सरकारी जागेवर पानपट्टी व कोल्ड्रिंक्सचे दुकान टाकून अतिक्रमण केले आहे तसेच शासनाच्या वाटप झालेल्या प्लॉटपेक्षा जास्त जागेवर अतिक्रमण केल्याचा आरोप होता, तसेच उपसरपंच पती यांनी सुद्धा ग्राम पंचायतच्या जागेवर अतिक्रमण केल्याचा आरोप होता, जिल्हाधिकारी यांचेकडे अतिक्रमण केल्याचे हे दोन्ही आरोप सिद्ध झाले त्यामुळे जिल्हाधिकारी अकोला यांनी सरपंच सुषमा शरद ठाकरे त्यांचे पती ग्राम पंचायत सदस्य शरद भगवान ठाकरे व उपसरपंच श्रद्धा पंकज काठोळे यांना दि १३/०७/२०२२ रोजी अपात्र घोषित केले. सदर प्रकरण दीपक अढाऊ यांचे कडुन ऍड.अभय थोरात यांनी तर अपात्र सरपंच, उपसरपंच यांच्याकडून ऍड.संतोष राहाटे यांनी काम पाहीले.

Previous articleअल्पवयीन बालिकेवर बलात्कार, आरोपी युवकाला जन्मठेप
Next articleमहिलांसाठी फॅशन डिझाईन प्रशिक्षण; 21 जुलैपर्यंत नाव नोंदणीचे आवाहन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here