महाराष्ट्राचे उज्वल भविष्य -अजितदादा पवार
अजितदादा पवार वाढदिवस विशेष लेख
महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री,विरोधी पक्षनेते व महाराष्ट्र राज्याचे उज्वल भविष्य श्री.अजितदादा पवार यांचा आज 63 वा वाढदिवस. त्यांच्यावर लेख लिहिलेला त्यांना आवडणार नाही याची जाणीव आहे.
शब्दाला जागणारा नेता,प्रशासनात अत्यंत काटेकोरपणे काम करणारे व्यक्तिमत्व काम होईल तर सरळ होकार कळवणारे आणि काम होणार नसेल तर स्पष्ट शब्दात सांगणारे व्यक्तिमत्व म्हणजे महाराष्ट्र राज्य विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार साहेब.
विकासाचा प्रेरणादायी प्रवास
छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालकापासून सुरू झालेला हा प्रवास राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री,महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री ते आता विधानसभेचे विरोधी पक्षनेते पदापर्यंत येऊन ठेपला आहे.
अजितदादा महाविकास आघाडी सरकारमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री झाले आणि राज्यात कोरोनाची परिस्थिती निर्माण झाली मात्र या परिस्थितीला दूर करण्यासाठी व राज्यातील प्रत्येकाला आरोग्य सुविधा सहकार्य मिळावे या उद्देशाने राज्याची घडी व्यवस्थित ठेवण्यासाठी मंत्रालयातील सहावा मजला सकाळी सहा वाजता पासून ते रात्री अकरा वाजेपर्यंत अखंडपणे सुरू असायचा. सहाव्या मजल्यातील उपमुख्यमंत्री कार्यालयाचे काम, बैठका,राज्यातील परिस्थिती कोरोनावर कशी मात करता येईल याबाबत अखंड कार्य करणारे अजितदादा कधीही थांबले नाहीत.
कर्तव्यदक्ष दादा
प्रशासनात अत्यंत शिस्तप्रिय, काटेकोर स्वभावाचे म्हणून अजितदादा ओळखले जातात ऐन कोरोना काळात उपमुख्यमंत्री कार्यालयात येणाऱ्या प्रत्येकाची फाईल कागदपत्रे सॅनिटाइज करूनच कार्यालयात जायची यावेळी प्रत्येकाने तोंडाला मास लावला पाहिजे असा दंडकच घातलेला होता. कारण कोरोना काळात उपमुख्यमंत्री अजित दादा यांच्या चेहऱ्यावरील मास्क कधीही खाली उतरला नाही. उपमुख्यमंत्री कार्यालयात खुर्च्यांची बसण्याची व्यवस्था कोरोनामुळे व्यवस्थित अंतर राखला जावं अशीच केलेली होती जो नियम कुणीही मोडला नाही.
माझ्यासारख्या शेतकरी कुटुंबातील एका सर्वसामान्य कार्यकर्त्यावर जीवापाड प्रेम देऊन राज्याच्या वरिष्ठ सभागृहात आमदार म्हणून संधी आदरणीय अजितदादांमुळेच मिळाली आहे.
अखंड कार्यरत लोकनेते
कोरोना काळात संपूर्ण राज्य नव्हे तर देश थांबलेला असताना राज्यातील अर्थव्यवस्था मजबूत ठेवण्याचे महत्त्वाचे कार्य अजितदादा यांनी केले. कोरोना परिस्थितीमध्ये केंद्र सरकारकडून खासदारांना एक छदामही निधी मिळालेला नसताना राज्यातील मात्र आमदारांचा विकास निधी अजितदादांनी वाढवून प्रत्येक मतदारसंघात महत्त्वपूर्ण कार्य करण्याची प्रेरणा दिली म्हणूनच त्यांच्या कामाचे कौतुक केवळ मित्र पक्षातीलच नव्हे तर विरोधी पक्षातील लोकांनी सुद्धा भरभरून केले आहे.
राज्याचे माजी अर्थमंत्री म्हणून अजित दादांनी कधीही निधी देताना कुणाचाही पक्ष किंवा संघटना पाहिली नाही मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री आणि सरकार हे केवळ एका पक्षाचे नसून संपूर्ण महाराष्ट्राचे असते हेच ब्रीद अजितदादांनी कायम आपल्या कार्यातून सिद्ध केले.
सकाळी सहा वाजता पासून पायाला भिंगरी बांधून अनेकांचे प्रश्न समस्या सोडवण्याचे महत्त्वाचे काम अजितदादांच्या माध्यमातून झाले आहे म्हणूनच त्यांच्या जनता दरबाराला राज्यभरातील नागरिक प्रश्न घेऊन यायचे कारण त्यामागे एक विश्वास होता की आपली समस्या अजितदादा सोडवतीलच.
अखंड लोकांमध्ये राहून कर्तव्यदक्ष म्हणून काम करणारे अजितदादा देशात सर्वाधिक मताधिक्याने निवडून आलेले विधानसभा सदस्य आहेत कारण त्यांच्या कर्तुत्वाला नागरिकांच्या सहकार्याची जोड मिळाली आहे.
जनता दरबार थांबला नाही थांबणार नाही
शिस्तप्रिय कार्याचे एक लोकविद्यापीठ म्हणून अनेक जण अजितदादांकडे पाहतात कारण त्यांची शैली आणि शिस्तप्रियता राजकारणाला समृद्ध करणारी आहे. उगाच प्रसिद्धीसाठी कधीही त्यांनी कार्य केले नाही. महाराष्ट्र हे कायम कुटुंब म्हणून उपमुख्यमंत्री असताना त्यांनी केलेले कार्य व महाराष्ट्राच्या तिजोरीवर कुठलाही भार न पडता राज्य कसं समृद्ध राखल्या जाईल हा केलेला यशस्वी प्रयत्न ज्याचा फायदा महाराष्ट्राला आजही होतो आहे.
आज अजित दादा पवार विरोधी पक्षनेते असताना सुद्धा त्यांचा बारामती येथे असणारा जनता दरबार अखंडपणे सुरू आहे नागरिकांचे प्रश्न समजून त्यांच्या सुखा दुःखात साथ देणारे उत्तुंग व्यक्तिमत्त्व म्हणून अजितदादा पवार हे माझ्यासाठी कायम प्रेरणा व मार्गदर्शक आहेत..
माजी उपमुख्यमंत्री विरोधी पक्षनेते अजित दादा पवार यांना 63 व्या वाढदिवसाच्या उदंड शुभेच्छा..
अपनी मंजिल पे पहुंचना भी खडे रहना भी !
कितना मुश्किल है बडे होकर बडा रहना भी!!
–
आमदार अमोल मिटकरी,
सदस्य,विधानपरिषद विधिमंडळ महाराष्ट्र राज्य






