Home मूल आज ही मला आठवत आहे ती गोष्ट ..
आठवण शाळेची
आज ही मला आठवत होती ती गोष्ट
ती 26 जानेवारी ते 15 ऑगस्ट ..
तो माझा वर्ग आणि तो शाळेचा मार्ग
विहिरीच्या बाजूचा पाण्याचा नळ
आणि बालक मंदिराच्या मुलाचा रळ
ते खो-खो चे ग्राउंड
वारमप करताना मारत असलेलो राउंड
सरस्वती ची शुक्रवार ची पूजा
आणि गुडफुटाण्याच्या प्रसाद ची मजा
ती ढोलवर ची पीटी
आणि बोदडे सरांची रेडी ची सिटी
तेही आठवले आज..
एनसीसी स्काऊट गाईड महाजन सरांचा तो आवाज
काळवीट सरांची ती क्रांतीकारकांची गोष्ट
मनावर बिंबली आहे आजही स्पष्ट
ठाकूर सरांच्या जिनायाहा मरणायाहा हा बासरीचा आवाज
गुंजत आहे कानात आज
बाबूजींच्या हस्ते तिरंगा फडकवणं
ढोल ताष्याच्या गजरात राष्ट्रगीताला ते सॅल्यूट करणं
गावातून गणपतीची ती मिरवणूक
आठवताच मला करते आजही भाऊक
पांडे सरांनी शिकवलेले अथर्वशीर्ष आजही आहे पाठ
गीतेचा बारावा अध्याय घेताना काजळे सर बसवत होते ताठ
खऱ्या अर्थाने आज मला घडवणारे प्रत्येक शीक्षकांची येत आहे आठवण
त्यांच्या प्रती त्यांच्या संस्कारांची मनात आहे साठवण
अस वाटतं परत तसच छोटं व्हावं
माझ्या त्या कोठारी शाळेत पुन्हा वर्गात जावं ..
माझ्या सर्व शिक्षकांना माझा प्रणाम
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
आपला विद्यार्थी,
कोठारी विद्यालय नांदुरा जि. बुलडाणा
© All Rights Reserved