डॉ.राकेश गावतुरे यांच्या वाढदिवसानिमित्त आगरझरी येथे शैक्षणिक साहित्य वाटप

0
91

भूमिपुत्र ब्रिगेड, शाखा आगरझरी द्वारे दिनांक 23 जुलै ला डॉ.राकेश गावतूरे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, आगरझरी येथे आगरजरी, अळेगाव ,टोला ,देवाडा या गावातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले व सोबतच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सुद्धा करण्यात आला.. यावेळेस डॉ. राकेश गावतुरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले .या कार्यक्रमासाठी मा.सुनीताताई काटकर ,सरपंच ग्रामपंचायत मोहरली , मा.भावनाताई मगरे ग्रामपंचायत सदस्य मोहुर्ली मा.देविदास मंगाम ,सामाजिक कार्यकर्ते , मा.साईनाथ एडमे सामाजिक कार्यकर्ते , मनोज उईके उपस्थित होते. तसेच भूमिपुत्र ब्रिगेड चे मा. सोमेश्वर पेंदाम , मा.अजय मडावी,राजकुमार किन्नाके,हरी कोडापे ,दिलीप तोडासे ,सुनील ए डमे ,शंकर अत्राम, राकेश मंगाम्, अरविंद गेडाम, आकाश मंगाम, नामदेव कोडापे ,भाऊराव कोडापे, भारत मंगाम या सर्वांचे कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजना करिता सहकार्य लाभले.

Previous articleतब्बल पंधरा दिवसापासून मुल तालुक्यातील बेंबाळ येथील इंटरनेट सेवा बंद
Next articleसावंगीत घरात घुसला बिबट्या, सहा तासाच्या थरारा नंतर बिबट्याने ठोकला धूम मुसळधार पावसामध्ये रात्री तीन वाजता पासून सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत वन विभाग व साब संस्थेने केला प्रयत्न

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here