बल्लारपूर पब्लिक स्कूल येथे आनंद मेळावा, सावित्री जयंती ‘FAMILY FUN DAY’ उत्साहात साजरा 

0
592

मूल :- शिक्षण प्रसारक मंडळ मूल द्वारा संचालित बल्लारपूर पब्लिक स्कूल मुल येथे दिनांक 03 जानेवारी 2025 रोज शुक्रवारला मोठया उत्साहात सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली तसेच विद्यार्थ्यांच्या विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी FAMILY FUN DAY आणि आनंद मेळावा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ऍड अनिल वैरागडे अध्यक्ष शिक्षण प्रसारक मंडळ मूल तसेच कार्यक्रमाचे विशेष अतिथी म्हणून दीपक बाकडे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती बल्लारपूर पब्लिक स्कूल मूल व प्रमुख अतिथी म्हणून शाळेचे प्राचार्य विनोद बोलीवार, आणि पठाण क्रीडा असोसिएशन हेंद्राबाद, तसेच विद्यार्थी प्रतिनिधी कुमार अंश तेलसे, आणि विद्यार्थिनी प्रतिनिधी कुमारी कशीश रामटेके मंचावर उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाची सुरवात सवित्रीबाई फूले यांच्या फोटोला दिपप्रज्वल आणि मालर्पण करून करण्यात आली तसेच कार्यक्रमाचे विशेष अतिथी म्हणून लाभलेले शाळेचे प्राचार्य विनोद बोलीवार यांनी विद्यार्थांना सावित्रीबाई फूले यांच्या जीवनावर प्रकाश टाकून विद्यार्थांना मंत्र मुग्ध केले तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभलेले ऍड अनिल वैरागडे अध्यक्ष शिक्षण प्रसारक मंडळ मूल यांनी सुद्धा विद्यार्थांना सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आपले मनोगत वक्त केले उपस्थित मंचावर उपस्थित सर्व मान्यवारांनी आपले मनोगत वक्त केले तसेच विद्यार्थांसाठी आनंद मेळावा आयोजित केला होता विद्यार्थी, विद्यार्थिनींनी विविध प्रकारचे खाद्य पदार्थ बनवून विक्री करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली. तसेच FAMILY FUN DAY कार्यक्रम विद्यार्थ्यां आणि पालकांसाठी आयोजित करण्यात आले होते पालकांनी व विद्यार्थांनी विविध खेळामध्ये सहभाग घेतला व एकल नृत्य, समूह नृत्य पालकांनी करून विद्यार्थ्यांना मंत्र मुग्ध केले आणि मोठया संख्येने पालकांनी उपस्थिती दर्शवली होती एकल नृत्य आणि समूह नृत्य स्पर्धेचे परीक्षक म्हणून अविनाश पाल, प्रणित नमुलवार, शारदा कोटगले यांनी केले तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तोषी जयस्वाल हिने केले व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन दर्शना शैलेकर हिने केले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेतील शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी यांनी अथक परिश्रम घेतले आणि कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम या राष्ट्रगानाने झाली.

Previous articleशूरवी महिला महाविद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी
Next articleजिजाऊ जयंती जन्मोत्सव सोहळा भव्य ढोल ताशाच्या गजरात रॅलीचे आयोजन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here