बुधवारला दुर्गा मंदिराचा ९ वा वर्धापन दिन सोहळा; दुर्गा मूर्तीचा होणार दुग्धाभिषेक 

0
162

मूल:- (कुमुदिनी भोयर) श्री मा दुर्गा मंदिर सेवा समितीच्या वतीने संचलन होत असलेल्या दुर्गा देवी मंदिराचा ९ वा वर्धापन दिन सोहळा दि. 26 फरवरी 2025 रोजी महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर विविध धार्मिक उपक्रमाने मोठ्या उत्साह साजरा करण्यात येत आहे. सकाळी ९ वा. समितीचे अध्यक्ष तथा चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष, माजी जिल्हा परिषद चे माजी अध्यक्ष संतोषसिह रावत व ममता रावत यांच्या हस्ते मंदिराचे पुजारी यांच्या मंत्रोपचार पद्धतीने देवीच्या मूर्तीची दुग्धभिषेक करून पूजा अर्चना करण्यात येणार आहे. दुपारी १२.२५ वा. महाआरतीचे आयोजन करण्यात आले असून दुपारी २ वा. महिलांकरिता कुंकुम पूजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे. ४ वाजेपासून उपवास निमित्त साबुदाणा खिचडी व केळी वाटप करण्यात येणार आहे. करिता जागृत माता महिषसूर मर्दिनी अष्टभुजा धारीनी श्री मॅ दुर्गा देवीच्या भक्तांनी महाशिवरात्रीच्या दिवशी आयोजित धार्मिक कार्यक्रमात उपस्थित राहून जागृत माता श्री मा दुर्गादेवीच्या आशीर्वाद घ्यावा अशी विनंती श्री मा दुर्गा मंदिर सेवा समितीच्या वतीने करण्यात येत आहे.

Previous articleशिवटेकडी मुल येथे भव्य महाशिवरात्री उत्सव
Next articleफिस्कुटी ग्राम पंचायतीतील भ्रष्टाचाराची लाचलुचपत विभाग करणार चौकशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here