नवभारत विद्यालय मुल येथे शालेय मंत्रिमंडळ समिती गठीत 

0
323

मूल:- नवभारत विद्यालय मुल येथे लोकशाहीच्या माध्यमातून शालेय मंत्रिमंडळ निवडणूक पार पडली. निवडणूक म्हणजे काय? मोठी माणसे मतदान कसे करतात? ईव्हीएम मशीन कशी असते? मतमोजणी कशी करतात? शाई का लावतात? आणि एकूण प्रक्रिया कशी असते? असे अनेक प्रश्न विद्यार्थी शाळेतील शिक्षकांना सतत विचारत असतात.

त्यावेळी शाळेतील शिक्षक यांनी शालेय विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया प्रत्यक्षात राबविण्याचा निर्णय सहकारी शिक्षकांनी घेतला आणि ही प्रक्रिया राबविली.

पाचवी ते दहावी पर्यंतसाठी प्रत्येक वर्गासाठीची विविध पदे सांगून वर्गस्तरची निवडणूक घेण्यात आली. यात मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री, शिक्षण, आरोग्य ,स्वच्छता, पर्यावरण , क्रीडा, अशी पदे निवडली गेली. सोबतच त्यांची कामे सांगून जबाबदारी देण्यात आली आणि शाळेचा मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री व इतर पदासाठी निवडणूक घ्यायची तयारी केली.

या पदासाठी विद्यार्थी उमेदवार इच्छुक होते. त्यांना एक दिवस प्रचार करण्यासाठी वेळ दिला. मतदान प्रक्रिया EVM Voter machine द्वारे पार पडली. मुख्य निवडणूक अधिकारी व्ही एस भांडारकर यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक घेण्यात आली.                                                                                           दि.04//08/2025 ला विद्यालयाच्या प्रांगणात रितसर निकाल श्री.एन एस माथनकर निवडणुक निर्णय अधिकारी यांच्या हस्ते जाहीर करण्यात आला. यावेळी शालेय शिस्त आणि गोपनीयतेची शपथ देण्यात आली. शालेय मंत्रिमंडळ निवडणूक 2025~26 करीता मुख्यमंत्री म्हणून प्रियांशु मुकेश गोवर्धन ,उपमुख्यमंत्री प्रिन्स महेंद्र चौरासिया, सांस्कृतिक मंत्री भारती रामचंद्र गेडाम, आरोग्यमंत्री काव्या शालिकराम तिवाडे, क्रीडामंत्री सिद्धी हिरालाल भोयर, शिक्षणमंत्री चैताली अरुण चौखुंडे, पर्यावरणमंत्री सनम रफिक खान पठाण यांना विजयी घोषित करण्यात आले. तसेच स्विकृत सदस्य अनुष्का संजय धारणे, आर्यन साईनाथ नैताम, चैतन्य राजेंद्र सूत्रपवार, आयुष जिवन किरमे, नैतिक प्रशांत गट्टूवार, ओम काजू खोब्रागडे यांची निवड केली. त्यांनतर त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

निवडून आलेल्या विद्यार्थ्यांना कामे कशी करायची, शिक्षकांना मदत केव्हा करावी, शिस्त व स्वच्छता ठेवण्यासाठी निवडून आलेल्या विद्यार्थ्यांना इतर विद्यार्थ्यांनी सहकार्य करावे. असे आवाहन मुख्याध्यापक श्री. ए एच झाडे सर, पर्यवेक्षिका सौ व्ही एस भांडारकर, जेष्ठ शिक्षक श्री. गुरुदास चौधरी सर व इतर सहकारी शिक्षक, शिक्षिका यांनी केले. मतदान अधिकारी श्री . व्हि. के. मेश्राम, कु.पि पी उमक, श्री. व्हि डी मोडक, बि. एच सलाम, व्ही एन निखारे, आर बी बोढे,पी पी वाळके, सी बी पुप्पलवार, कु.डी एस गोंगल, कु .एम एन तलांडे, एस एन चौधरी, टि जी निमसरकार यु. एस. चौधरी या शिक्षकांनी निवडणुक प्रक्रिया जबाबदारीने पार पाडली.

Previous articleमूल तहसिल कार्यालयात १ ते ७ ऑगस्ट दरम्यान महसूल सप्ताहाचे आयोजन
Next articleरक्षाबंधनाचा पवित्र धागा म्हणजे प्रेम, विश्वास व नात्यांचे बळ; मुल तालुका भाजपाच्या वतीने उत्साहात पार पडला रक्षाबंधन सोहळा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here