जास्तीत जास्त सदस्य बनवून पक्षसंघटन वाढवा : जिल्हाप्रमुख अड.युवराज धानोरकर.  बल्लारपूर व मुल येथे शिवसेना सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात

0
341

मुल- शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अड.युवराज धानोरकर यांच्या नेतृत्वात बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील मुल येथे शिवसेना शिंदे गटाच्या सदस्य अभियानाला सुरुवात करण्यात आली. क्षेत्रातील शिवसेनेच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेना नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विचार जनमानसात पोहोचवून क्षेत्रात जास्तीतजास्त नागरिकांना शिवसेनेशी जोडून व सदस्य तयार करून पक्षाचे संघटन वाढवून पक्ष बळकट करण्याचे आवाहन यावेळी जिल्हाप्रमुख अड.युवराज धानोरकर यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना केले.त्याबरोबरच येऊ घातलेल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत जास्तीतजास्त स्वराज्य संस्थांवर शिवसेनेचा भगवा फडकाविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहणही त्यांनी केले. यावेळी जिल्हाप्रमुख अड.युवराज धानोरकर, युवा सेनाप्रमुख शैलेश केळझरकर, महिला आघाडी जिल्हाप्रमुख भारती राकडे, मुल शिवसेना चे प्रमुख विशाल नागुलवार , महिला विधानसभा प्रमुख शितलताई बेलफुलवार , तालुका संघटक अफजल वाढई,उपतालुकाप्रमुख संतोष ईप्पलवार , युवासेना तालुकाप्रमुख स्वप्निल आकेवार,महिला तालुकाप्रमुख शालिनी खैरे ,महिला शहर प्रमुख अर्चना साहारे , युवासेना शहर प्रमुख टिकू दुधे,उपशहर प्रमुख उर्मिला कोहळे ,मुल शाखाप्रमुख रोहित मुतेलवार, स्वप्निल नागोसे, सतीश वैरागडवार ,सक्षम वाळके, प्रेम बंडीवार ,आदिंची ऊपस्थिती होती.

Previous articleपोंभुर्णा तालुक्यातील मौजा देवई, केमारा व भटारी वनजमिनीवरील अतिक्रमण पट्टे देण्यासंदर्भात बैठक
Next articleसुभाष उच्च प्राथमिक शाळा मुल येथे शिक्षक दिन साजरा आदर्श सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here