मुल:- महाराष्ट्र राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री व बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय (आमदार ) लोकनेते ,मा. सुधीरभाऊ मुनगंटीवार हे गणेश उत्सवानिमित्त दर्शनाकरिता मूल नगरीत आले असता राजे युवा गणेश मंडळ मुल येथे भेट दिली. त्यादरम्यान अखिल भारतीय सफाई मजदूर कामगार संघटना रजि.न.7262 महाराष्ट्र प्रदेश तालुका शाखा मुल जिल्हा चंद्रपूर कामगार संघटनेच्या वतीने संघटनेचे तालुका अध्यक्ष, संदीप पारचे यांनी गणेश मंडळात सुधीर मुनगंटीवार यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. लाड पांगे समितीच्या प्रलंबित प्रश्नासंदर्भात विधानसभेच्या पडलावर समस्त राज्यातील सफाई कामगारांची बाजू मांडली व सफाई कामगारांना न्याय मिळवून देण्याची भूमिका ठेवली आणि सफाई कामगारांचे प्रश्न त्वरित निकाली काढा असे प्रश्न उपस्थित केले . संघटनेच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले. व मुल येथील नगरपरिषदेच्या सफाई कामगारांच्या प्रश्न संदर्भात, डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रम साफल्य योजने अंतर्गत मुल नगर परिषदेमध्ये ज्या सफाई कामगारांची सेवा पंचवीस वर्षे झाली आहे ते निवृत्ती झाले आहे किंवा मयत झाले आहे अशा सफाई कामगारांना दिनांक 28 ऑक्टोबर 2008 शासन निर्णय नगर विकास विभाग या योजने अंतर्गत घर बांधून देणे करिता मागणी करावी असे निवेदन देण्यात आले. सुधीर भाऊंनी सुद्धा यावर सकारात्मकता दर्शवली म्हटले की नगर विकास विभागाशी चर्चा करून गंभीरतेने हा प्रश्न निकाली काढू अशी हमी संघटनेला व मुल येथील सफाई कामगारांना दिली.





