कोहिनूर ऑफ इंडिया पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रेस क्लब मूल च्या वतीने आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा सत्कार

0
268

मूल : माजी मंत्री व विद्यमान आमदार सुधीर मुनगंटीवार यांना नुकतेच लंडन येथे ‘कोहिनूर ऑफ इंडिया’ हा मानाचा पुरस्कार देण्यात आला. या यशाचा गौरव म्हणून मूल येथील कन्नमवार सभागृहात त्यांचा नागरी सत्कार सोहळा पार पडला.

या कार्यक्रमात प्रेस क्लब, मूल च्या वतीने शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन आमदार मुनगंटीवार यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी प्रेस क्लबचे अध्यक्ष नासीर खान, सचिव कुमुदिनी भोयर, सहसचिव दत्ता वाराणशिवार तसेच सदस्य विजय सिद्धावार, नितेश मॅकलवार, आनंदराव कुडे उपस्थित होते.

सत्कार स्वीकारताना आमदार मुनगंटीवार म्हणाले, “लंडनमध्ये मिळालेला हा पुरस्कार माझ्या व्यक्तिगत कार्याचा नव्हे तर संपूर्ण विदर्भ, चंद्रपूर जिल्हा आणि मूल शहराच्या कर्तृत्वाचा गौरव आहे. आपल्या लोकांचे आशीर्वाद आणि सहकार्य हीच माझी खरी ताकद आहे.”

कार्यक्रमाला मूल शहरातील अनेक मान्यवर व नागरिक उपस्थित राहून आमदार मुनगंटीवार यांचे अभिनंदन केले. सत्कार समारंभामुळे शहरात उत्साहाचे आणि अभिमानाचे वातावरण होते.

Previous articleमुल येथे आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा
Next articleशूरवी महिला महाविद्यालय, मूल येथे AI व सायबर क्राईम विषयावर मार्गदर्शन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here