मूल – शूरवी महिला महाविद्यालयात महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड (MKCL) तर्फे विद्यार्थिनींसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि सायबर क्राईम या विषयावर मार्गदर्शनपर सत्र आयोजित करण्यात आले. या सत्रात तज्ज्ञांनी डिजिटल युगातील कृत्रिम बुद्धिमत्तेची वाढती गरज, सायबर गुन्ह्यांचे प्रकार, प्रतिबंधक उपाय आणि सुरक्षित इंटरनेट वापराबाबत सविस्तर माहिती दिली.
या मार्गदर्शन सत्रामुळे विद्यार्थिनींमध्ये सायबर सुरक्षेबद्दल जागरूकता निर्माण झाली असून तंत्रज्ञानाचा जबाबदारीने वापर करण्याचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापकवर्ग व विद्यार्थिनींची उपस्थिती लाभली.





