मुल येथिल शिवटेकडी व बौद्धटेकडीवर पिण्याचा पाण्याची व विजेची व्यवस्था करा ; युवाक्रांती संघटनेचे मुनगंटीवार यांना निवेदन

0
199

मूल येथिल शिवटेकडी व बौध्दटेकडीवर पिण्याच्या पाण्याची व विजेची सोय व्यवस्था करून देण्याकरिता माजी मंत्री तथा बल्लारपूर क्षेत्राचे आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना युवक्रांती संघटने तर्फे निवेदन देण्यात आले.

घनदाट जंगल परिसर असलेल्या मूल येथिल चंद्रपूर मार्गावरीलशि वटेकडी व बौध्द टेकडीवर मोठया संख्येने भाविक येत असतात, मात्र विजेची सोय नसल्यामुळे रात्रीच्या वेळेस भाविकांना ये-जा करणे सोयीचे नाही. गेल्या दोन महिण्यापासुन याठिकाणी विजेची सोय नसल्याने बिबटयाने एका झाडावर थान मांडुन बसलेले नागरीकांना दिसुन आले. यामुळे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

श्रावण महिन्यात, शिवरात्री ला तसेच 4 नोव्हेंबर रोजी बुध्द टेकाडीचा वर्धापण दिन असतो. वर्धापण दिनी जिल्हा व बाहेरील जिल्हयातील नागरीक मोठया संख्येने याठिकाणी येत असतात, मात्र याठिकाणी पाण्याची व्यवस्था व इलेक्ट्रीकची सोय नसल्याने भाविकांची गैरसोय होत आहे.

आपण विज आणि पाण्याची व्यवस्था करून दयावे अशी विनंती युवक्रांती संघटनेच्या वतीने माजी मंत्री तथा बल्लारपूर क्षेत्राचे आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना करण्यात आली आली. यावेळी युवा क्रांती संघटनेचे प्रणित पाल, निखिल वाढई, अक्षय दुम्मावार निहाल गेडाम ,हर्षवर्धन दुपारे, राज चिमूलवार, कालिदास गुरनुले,तुषार घ्यार, सुमित दुपारे, ओम लाटकर, दिनेश गुरनुले, यामावार,किशोर चौकुंडे, ईश्वर लोणबले, शेंडे काकू , खोब्रागडे काकू इत्यादी उपस्थित होते.

Previous articleशूरवी महिला महाविद्यालय, मूल येथे AI व सायबर क्राईम विषयावर मार्गदर्शन
Next articleभजन हे श्रद्धा, अध्यात्म आणि एकात्मतेचे प्रेरणादायी माध्यम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here