मुल:-
मूल शहराला पाणी पुरवणारी जुनी हरणघाट पाणी पुरवठा योजना अपूरी ठरु लागल्याची बाब क्षेत्राचे आमदार. ना. सुधिरभाऊ मुनगंटीवार यांच्या लक्षात येताच, आता मूलवासियांना २४/७ दिवस पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व्हावा यासाठी न.प.रा सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान’ अंतर्गत २८ कोटी रूपये वाढीव पाणी पुरवठा योजनेसाठी मंजूर करण्यात आले.
मात्र योजना पूर्ण झाल्यानंतर मूल नगरवासियांना २४/७ सोडा घंटा, दिड घंटा सुद्धा शुद्ध पाणी मिळत नसल्याने शहरात जी बोंब सुरु झाली आहे ती बघता महाराष्ट्र जिवन प्राधिकरणाचे तांत्रिक देखरेखीत पूर्ण झालेली ही पाणी पुरवठा योजना भसकली व करोडो रुपये पाण्यात गेले काय? हा गंभीर सवाल उपस्थित झाला आहे.
शहरात काही ठिकाणी सकाळी पाणी पुरवठा केला जातो तर काही ठिकाणी सायंकाळी पाणी पुरवठा केला जातो. शहरात कामगार पुरुष स्त्री वर्गाची संख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे सायंकाळी होणारा पाणी पुरवठा हा तीन वाजताच्या सुमारास सुरु केला जातो कामगार वर्ग त्या वेळेस घरी उपलब्ध राहत नसल्यामुळे त्यांना पिण्याचे पाणी सुद्धा मिळणे कठीण झाले आहे. व काही भागात नळाला आवश्यक ते पेक्षा जास्त पाणी सोडल्या जाते तर काही ठिकाणी कमी वेळासाठी पाणी येतो हि सुद्धा समस्या आहे तसेच नविन पाईपलाईनला तांत्रिक लिकेजेस भरपूर असल्याने पाणी पिवळसर येत आहे, अनारोग्य वाढण्याच्या भितीने नागरीक आर. ओ. कडे धावू लागले आहे. याचीच बाब लक्षात घेता शिवसेना पक्षाचे पदाधिकाऱ्यांनी नगरपरिषद गाठली व नागरिकांची समस्या सांगुन त्यांच्यावर उपाययोजना करावा अन्यथा शिवसेना स्टाइल ने आंदोलन करू असे निवेदन शिवसेना मुल चे विशालभाऊ नागुलवार यांचा मार्गदर्शनात महिला आघाडी शहर प्रमुख अर्चना सहारे यांनी दिले.
निवेदन देताना शिवसेनेचे महिला आघाडी जिल्हाप्रमुख भारती राखडे महिला विधानसभा प्रमुख, शितल वेळफुलवार, उपतालुकाप्रमुख संतोष इप्पलवार, महिला तालुका प्रमुख शालिनी खैरे व शिवसैनिक उपस्थित होते.





