*मुल:* श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणाऱ्या साईबाबांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी. साई भक्ती सेवा समिती, मुल यांच्या वतीने हनुमान मंदिर, बस स्टॉप परिसरात साईबाबा मूर्ती स्थापना दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
हा पवित्र सोहळा *11 जून 2026, गुरुवार* रोजी मोठ्या भक्तिभावाने साजरा होणार आहे. सकाळी 9 वाजता साई मूर्तीची पूजा व अभिषेकाने कार्यक्रमाला सुरुवात होईल. त्यानंतर दुपारी 12 वाजता भजन काला आणि दुपारी 3 वाजता सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
सोहळ्याचा मुख्य आकर्षण म्हणजे सायंकाळी 5 वाजता निघणारी साईबाबांची पालखी व शोभा यात्रा. ढोल-ताशांच्या गजरात निघणारी ही यात्रा मुल परिसरातील भक्तांसाठी श्रद्धेचा सोहळा ठरणार आहे. रात्री 8 वाजता आरतीने कार्यक्रमाची सांगता होईल.
साई भक्ती सेवा समितीचे मार्गदर्शक श्री. संतोषभाऊ रावत व श्री. राकेशभाऊ रत्नावार यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा पार पडणार आहे. सर्व साई भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.





