भाजपा जिल्हा महासचिव नीलम निखिल सुरमवार यांचा भाजपा मूल शहरच्या वतीने सत्कार

0
151

भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा महासचिव सौ. नीलम निखिल सुरमवार यांचा भारतीय जनता पार्टी मूल शहरच्या वतीने शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी भाजपा मूल शहरचे अध्यक्ष प्रवीण मोहुर्ले यांनी नीलम सुरमवार यांचे अभिनंदन करून त्यांच्या संघटनात्मक कार्याचा गौरव केला. पक्ष संघटना बळकट करण्यासाठी तसेच समाजहिताच्या विविध उपक्रमांमध्ये त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला.

सौ. नीलम सुरमवार यांनी सत्काराबद्दल आभार व्यक्त करत पक्षाची विचारधारा तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी अधिक जोमाने काम करण्याचे आवाहन केले.

या प्रसंगी अनुसूचित जाती आघाडीचे अध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, जिल्हा कार्यक्रम प्रमुख सौ. किरण कापगते,नगर परिषद मूल नगर सेविका सौ. अश्विनी निकोडे,मिडिया प्रमुख राकेश कोंडबत्तुलवार, सावली शहर अध्यक्ष आशिष कार्लेकर,मूल युवा मोर्चा शहर अध्यक्ष पंकज लाडवे,भाजपा उपाध्यक्ष मूल सुखदेव चौथाले, किशोर कापगते, रुपेश निकोडे यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आयोजन भाजपा मूल शहरच्या वतीने करण्यात आले असून उपस्थितांनी सौ. नीलम निखिल सुरमवार यांना पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Previous articleमुलमध्ये साईबाबा मूर्ती स्थापना दिन सोहळा 11 जूनला – पालखी सोहळा व महाप्रसादाचे आयोजन
Next article१९५ पुस्तकांचे ज्ञानदान – दांडेकर दाम्पत्याचा आदर्श: मुलगी डॉक्टर, मुलगा इंजिनियर झाला, पुस्तकं वाचनालयाला भेट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here