मुलच्या शासकीय गोडाऊनमध्ये भरदिवसा लोखंडी रॉडने हल्ला ; जखमी मरणसुन्न अवस्थेत

0
217

मुल, दि. 10/06/2026 दुपारी 3 वाजता: कायद्याचा धाक धाब्यावर बसवत मुल शहरातील शासकीय गोडाऊन परिसरात भरदिवसा एका व्यक्तीवर जीवघेणा हल्ला करण्यात आला. या घटनेने संपूर्ण शहर हादरले आहे.अक्षय गोवर्धन (वय ४० )याने जुन्या वादातून मारुती मेश्राम (वय ४२)  याच्यावर रोखंडी रॉडने तुफान मारहाण केली. हल्ला इतका भयंकर होता की मारुती मेश्राम हा मरणसुन्न अवस्थेत जमिनीवर कोसळला.

घटनेची माहिती मिळताच नगरसेवक राहुल प्रेमलवार यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमीला उपजिल्हा रुग्णालयात मुल येथे दाखल केले. प्रकृती गंभीर असल्याने त्याला बल्लारपूर वाघमारे हॉस्पिटल येथे उपचार करून. नागपूर येथील एम्स हॉस्पिटल मध्ये रेफर करण्यात आले. सध्या त्याची प्रकृती चिंताजनक आहे.

पीआय राठोड यांनी घटनास्थळी तात्काळ पंचनामा करून तपास सुरू केला. हल्ल्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आरोपी अक्षय गोवर्धन याने स्वतः मुल पोलीस स्टेशन गाठून शरणागती पत्करली.भरदिवसा शासकीय गोडाऊनसारख्या सार्वजनिक ठिकाणी झालेल्या या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात भीती आणि संताप व्यक्त होत आहे. मुल शहरात पुन्हा एकदा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

दरम्यान, या घटनेमागे जुन्या वादासोबतच प्रेमसंबंधाचा मुद्दा असल्याची चर्चा स्थानिक नागरिकांमध्ये सुरू आहे. मात्र पोलिसांनी हल्ल्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट केलेले नाही. तपासानंतरच खरी वस्तुस्थिती समोर येईल.

Previous articleग्राहकहितासाठी शिरभाते साहेबांची धडक कारवाई – पेट्रोल पंपांवर पाणी-स्वच्छतागृह सुविधा सक्तीच्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here