मुल:- ( कुमुदिनी भोयर ) प्रभाग क्रमांक 8 मधील रहिवासी श्री. लालाजी बावणे यांच्या घरी दि. 08/06/2026 रोजी झालेल्या घरफोडी प्रकरणाचा तपास मूल पोलिसांनी सुरू केला आहे. या घटनेत चोरट्यांनी घरातील दागिने व रोख रक्कम लंपास केली होती.
घटनेची माहिती मिळताच पीआय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यास सुरुवात केली आहे. तसेच संशयितांची माहिती गोळा करून त्यांचा शोध घेतला जात आहे.दि. 10/06/2026 रोजी भावना अरुण चौखुंडे यांच्या नेतृत्वात प्रभाग 8 च्या महिलांच्या शिष्टमंडळाने मूल पोलिस ठाण्यात निवेदन सादर केले.bनिवेदन देताना वर्षा नागापुरे, भूमिका चौखुंडे, वैशाली घायर, सुषमा मोहुर्ले, सविता कावळे, मीना येवतकर,वंदना मडावी,स्मिता साखरकर,चैताली चौखुंडे, श्रद्धा कावळे,दर्शना गुडल्लावार, शीतल मेश्राम,भैरवी चौखुंडे, शीतल बोरकुटे तसेच ज्योती बावणे उपस्थित होत्या.
निवेदनात प्रभागात पोलिस गस्त वाढविणे, संशयितांवर लक्ष ठेवणे आणि सीसीटीव्ही व्यवस्था प्रभावी करण्याची मागणी करण्यात आली. तसेच “चोरीच्या घटनेचा सखोल तपास करून आरोपींना लवकरात लवकर अटक करावी आणि परिसरातील नागरिकांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून द्यावे” अशी मागणी यावेळी करण्यात आली.
पोलिसांनी निवेदनाची दखल घेत प्रभाग 8 मध्ये रात्रीच्या गस्ती वाढविण्याचे आणि पॉईंटवर कॉन्स्टेबल तैनात करण्याचे आश्वासन दिले आहे.पीआय राठोड म्हणाले, “घरफोडी प्रकरणाचा तपास गांभीर्याने सुरू आहे. लवकरच आरोपींना ताब्यात घेऊन चोरीचा माल हस्तगत करू. नागरिकांनी संशयास्पद हालचाल दिसल्यास 100 नंबरवर संपर्क साधावा.”





