१९५ पुस्तकांचे ज्ञानदान – दांडेकर दाम्पत्याचा आदर्श: मुलगी डॉक्टर, मुलगा इंजिनियर झाला, पुस्तकं वाचनालयाला भेट

0
210

मुल: “पुस्तकं रद्दीत न टाकता पुढच्या पिढीला द्या” – हा आदर्श संदेश देत मुल येथील *विनोद रामचंद्र दांडेकर*, डॉ. किशोरी विनोद दांडेकर यांनी आपल्या मुला-मुलींसाठी घेतलेली 195 महागडी स्पर्धा परीक्षा पुस्तके श्यामप्रसाद मुखर्जी सार्वजनिक वाचनालय, मुल येथे भेट दिली आहेत.

NEET, JEE, JIPMER साठीची Objective Physics, Organic Chemistry, 46 Years IIT-JEE Solved Papers, JEE Main Chapterwise Solved Papers सारखी हजारो रुपयांची मौल्यवान पुस्तके विकण्याऐवजी किंवा रद्दीत टाकण्याऐवजी त्यांनी ज्ञानदानाचा मार्ग निवडला.

या पुस्तकांची खास गोष्ट म्हणजे *या पुस्तकांमधूनच शिक्षण घेऊन त्यांच्या कन्या डॉ. मिनल विनोद दांडेकर या डॉक्टर झाल्या आहेत आणि मुलगा प्रथमेश दांडेकर इंजिनिअरिंग करीत आहे.* स्वतःच्या मुलांना डॉक्टर-इंजिनियर घडवणाऱ्या या पुस्तकांमुळे आता गावातील इतर होतकरू विद्यार्थीही डॉक्टर, इंजिनियर होतील, अशी त्यांची इच्छा आहे.

*”शिक्षण हेच साधन आहे, ज्या शिक्षणाने चारित्र्य घडते, मनाचा विकास होतो”* – स्वामी विवेकानंद यांच्या या विचाराला अनुसरून दांडेकर दाम्पत्याने केलेले हे ज्ञानदान इतर पालकांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल.

महागड्या पुस्तकांअभावी शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम वरदान ठरणार आहे. दांडेकर दाम्पत्याच्या या कौतुकास्पद उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Previous articleभाजपा जिल्हा महासचिव नीलम निखिल सुरमवार यांचा भाजपा मूल शहरच्या वतीने सत्कार
Next articleप्रभाग 8 मधील घरफोडीचा तपास सुरू ; भावना चौखुंडेंसह महिलांच्या शिष्टमंडळाने दिले निवेदन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here