ग्राहकहितासाठी शिरभाते साहेबांची धडक कारवाई – पेट्रोल पंपांवर पाणी-स्वच्छतागृह सुविधा सक्तीच्या

0
108

मुल:- ( कुमुदिनी भोयर ) उन्हाळ्याच्या तीव्र झळा आणि लांब पल्ल्याच्या प्रवासात वाहनधारकांना भेडसावणाऱ्या मूलभूत सुविधांच्या प्रश्नावर आता तोडगा निघाला आहे.

तालुका अन्न पुरवठा निरीक्षक राजेश शिरभाते साहेब यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे आणि संवेदनशीलतेमुळे तालुक्यातील पेट्रोल पंपांवर ग्राहकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली तराजेश शिरभाते साहेबांनी स्वतः पुढाकार घेऊन तालुक्यातील अनेक पेट्रोल पंपांवर अचानक पाहणी मोहीम राबवली. या पाहणीत त्यांना अनेक पंपांवर *पिण्याचे शुद्ध पाणी, स्वच्छ व कार्यरत स्वच्छतागृह तसेच प्राथमिक उपचार पेटी* यांसारख्या बंधनकारक सुविधा उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले.

ग्राहकांच्या हिताला प्राधान्य देत श्री. शिरभाते साहेबांनी संबंधित पंप संचालकांना तात्काळ नोटीस बजावल्या. त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की, “ग्राहकांना सुविधा देणे ही पंप मालकांची कायदेशीर जबाबदारी आहे. त्यात कसूर खपवून घेतला जाणार नाही.”

श्री. शिरभाते साहेबांच्या या कठोर पण योग्य भूमिकेमुळे अवघ्या काही दिवसांतच तालुक्यातील बहुतेक पेट्रोल पंपांवर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि स्वच्छतागृह सुरू करण्यात आले आहेत.

उल्लेखनीय बाब म्हणजे, यापूर्वी तालुक्यात गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाला असता श्री. शिरभाते साहेबांनी नागरिकांना मोठी मदत केली होती. त्या काळात त्यांनी स्वतः लक्ष घालून गॅस वितरण व्यवस्थित केले होते. त्यामुळे नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल आदर आणि विश्वासाची भावना आहे.

महिला, लहान मुले, वृद्ध नागरिक आणि लांब पल्ल्याचे प्रवासी यांना आता पेट्रोल भरताना मूलभूत सुविधांसाठी भटकावे लागणार नाही. श्री. शिरभाते साहेबांच्या या निर्णयामुळे नागरिकांनी त्यांचे विशेष आभार मानले आहेत आणि प्रशासनाच्या या संवेदनशील कारवाईचे कौतुक केले आहे.

Previous articleप्रभाग 8 मधील घरफोडीचा तपास सुरू ; भावना चौखुंडेंसह महिलांच्या शिष्टमंडळाने दिले निवेदन
Next articleमुलच्या शासकीय गोडाऊनमध्ये भरदिवसा लोखंडी रॉडने हल्ला ; जखमी मरणसुन्न अवस्थेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here