प्रतिनिधी:- कुमुदिनी भोयर
मुल येथील सामाजिक कार्यकर्ते रुपेश पाटील मारकवार हे आपल्या एक नातेवाईकाला सोडायला मुल येथील बस स्थानकावर आले, सध्या लगणसराईचे दिवस असल्याने बस स्थानकावर प्रवाशांची प्रचंड गर्दी आहे, त्यातल्या त्यात महाराष्ट्र शासनाने महिलांना शासकीय बस ची तिकीट अर्धी केली असल्याने मागील वर्षभरात महीला प्रवाशांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे, अशी ही गर्दी बस स्थानकावर असून इथे मात्र बस स्थानकावरील थंड पाण्याची मशीन नादुरुस्त असून त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असल्याची बाब रुपेश पाटील मारकवार यांच्या लक्षात आली, त्यांनी क्षणाचाही विलंब न करता क्षेत्राचे कार्यकुशल आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना भ्रमणध्वनी द्वारे संपर्क केला व सदर गैरसोयीची माहिती दिली, मागणी आल्यानंतर ती पूर्ण केली नाही तर मग सुधीर भाऊ कसले त्यांनी रुपेश पाटील यांना दोन दिवसात या समस्यांचे निराकरण होईल याचा शब्द दिला आणि अगदी दोन दिवसात मुल बस स्थानकावरील थंड पेय जल मशीन सुरू झाली, रुपेश पाटील मारकवार आणि समस्त जनतेने सुधीरभाऊ यांचे आभार मानले आहे.