पहलगाम मध्ये अडकलेले मूल येथील 6 पर्यटक सुखरूप परतले

0
1240

मूल (कुमुदिनी भोयर )

श्रीनगर मधील पहलगाम येथे पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांवर आंतकवाद्यानी गोळीबार करीत 26 निष्पापांना ठार मारले. याच दरम्यान मूल शहरातील 6 पर्यटकांचे काय झाले असेल? हा प्रश्न निर्माण होवून अनेकांना काळजी वाटत असतांनाच, मूल शहरातील हे सहा पर्यटक सुखरूप आपले गावी पोहचल्यांने, अनेकांनी सुटकेला निश्वास टाकला. पर्यटकांनी गावात पोहचताच, आनंद व्यक्त केला. 11 एप्रिल ते 26 एप्रिल पर्यंत या पर्यटकांचा काश्मीर टूर होता. यामधे युगविनाश रामटेके (आयोजक), योगेश गेडाम , कविता नागापुरे, नीता चौधरी व इतर 2 असे एकूण 6 व्यक्ती मूल तसेच 33 व्यक्ती गडचिरोली 5 व्यक्ती चंद्रपूर असे एकूण 44 पर्यटक होते. त्यामध्ये सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक सेवानिवृत्त नायब तहसीलदार अशा अधिकारी व्यक्तींचा सुद्धा समावेश होता. दिनांक 22 एप्रिल ला सकाळी 7:20 पासून सायंकाळी 5 पर्यंत पहलगाम या पर्यटक स्थळावर हे पर्यटक होते.

मूल येथील पर्यटकांसोबत गेलेले 16 लोक घोड्यावरती बसून मिनी स्विझरलँड या पॉइंट वरती साईट सीन साठी गेले होते, त्यादरम्यान साईट सीन करून खाली परतीच्या मार्गावर लागले असता वरच्या भागात आतंकी गोळीबार झाला व तिथलं शांत वातावरणाने अवघ्या काही मिनिटातच वेगळं रूप धारण केलं तिथलं दृश्य पाहण्यासारख नव्हतं अस येथिल प्रत्यक्ष दर्शी युगविनाश रामतेके यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितलं.

मृतकांच्या नातेवाहिकांना मूल येथील युगविनाश रामटेके व त्यांचे पर्यटक सहमित्र स्वतः वेळेवर लागणाऱ्या मदतीस हातभार लावला महत्वाच म्हणजे मूल येथील सर्व पर्यटक सुखरूप पार्किंग मध्ये परत आले कुणालाही कोणती ईजा झाली नाही फक्त 20 मिनिटाच्या फरकाने हे सर्व पर्यटक सुरक्षीत बचावले, या दरम्यान दोन तासाच्या जाम मधून पहलगामच्या बाहेर निघण्यात संघर्ष करावा लागला.

Previous articleचंद्रपूर जिल्ह्यात मध्ये भीषण उष्णतेचा कहर; मुल तालुक्यातील शाळांना तात्काळ सुट्ट्या जाहीर करण्याची भाजप युवा मोर्चाची मागणी
Next articleपहलगाम दहशतवादी हल्ल्याचा शिवसेनेच्या वतीने जाहीर निषेध

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here