मुल शहरामध्ये घरगुती गॅसचा अभाव स्थायी गॅस एजन्सी मंजुर करा! स्वराज्य स्वाभिमानी संघटनेचे निवेदन, आंदोलनाचा इशारा

0
193

Mul:- मूल शहरामध्ये पूर्वी कार्यरत असलेली HP गॅस एजन्सी रद्द करून चिचपल्ली व सावली येथील गॅस एजन्सीकडून मूल शहरात गॅस सिलेंडरचा पुरवठा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. परंतु सावली व चिचपल्ली येथील गॅस एजन्सी मूल शहरातील नागरिकांना नियमित व सुरळीत गॅस सिलेंडरचा पुरवठा करण्यास सक्षम नसल्याचे दिसून येत आहे.
यामुळे मूल शहरातील नागरिकांना गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.otp न येणे, कॅश मेमो चा मॅसेज येऊनसुद्धा कित्येक दिवसापर्यंत सिलेंडर घर पोहचवण्यास विलंब होत आहे ,गॅस एजन्सी कर्मचारी ग्राहकाचे फोन स्वीकारत नाहीत त्यांना समाधारण कारक उत्तर ही देत नाहीत, अनेक नागरिकांना दिवसभर रांगेत उभे राहूनही सिलेंडर मिळत नाही आहे . त्यामुळे त्यांना प्रवास खर्च, वेळ, आणि श्रमाचा मोठा भुदंड सहन करावा लागत आहे त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली असून दैनंदिन जीवनात मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत.सिलेंडर उपलब्ध नसल्यामुळे अनेक घरामध्ये पुन्हा सरपणावर स्वयंपाक करावा लागत आहे आधुनिक सुविधा असतानाही नागरिकांना जुन्या पद्धतीकडे वळावे लागत आहे
नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन मूल शहरातील रद्द केलेली HP गॅस एजन्सी तात्काळ नविन वितरकाला वितरित करून सुरू करण्यात यावी जेणेकरून नागरिकांना गॅस सिलेंडरचा नियमित पुरवठा मिळेल.
27 ऑगस्ट 2025 रोजी संजय फ्लेम एजन्सीच्या गॅस सिलेंडर गोदामात अचानक स्फोट झाला शहरातील नागरिकांच्या मते हा स्फोट गॅस सिलेंडर मधुन गॅस चोरी करीत असताना झाला असावा अशी चर्चा संपूर्ण शहरात पसरली होती त्यामुळे संजय फ्लेम या गॅस इजन्सीला मुल शहरात गॅस वितरित करण्याची जबाबदारी पुन्हा देऊ नये त्याऐवजी नवीन वितरकाला काम देऊन नागरिकांना होणाऱ्या समस्याचे निराकरण करण्याची मागणी स्वराज्य स्वाभिमानी संघटनेच्या वतीने तहसीलदार मृदुला मोरे व नायब तहसीलदार दिनेश पवार यांना निवेदनाद्वारे केली
तसेच गॅस सिलेंडर वितरित करणाऱ्या गाडीवर ग्राहकांना सिलेंडरचे वजन करून देण्यासाठी कुठल्याच प्रकारचे वजन काटे उपलब्ध नसल्याने वितरित केले जाणारे सिलेंडर योग्य वजनाने भरले आहेत का ? यावर सुद्धा लक्ष देणे गरजेचे आहे त्यामुळे प्रत्येक सिलेंडर वाटप करणाऱ्या गाडीवर व गोदामात वजन काट्याची उपलब्धता अनिवार्य करून ग्राहकांना योग्य वजन करून सिलेंडरचे वाटप करावे जेणेकरून ग्राहकांची आर्थिक फसवणूक होणार नाही.
वरील सर्व मागण्या नागरिकांच्या हिताच्या आहेत त्यामुळे मुल शहरात लवकरात लवकर नविन गॅस एजन्सी सुरु करून नागरिकांची गैरसोय थांबविण्याची मागणी आकाश कावळे अध्यक्ष स्वराज्य स्वाभिमानी संगटना मुल, संदीप मोहबे भाजपा मुल शहर उपाध्यक्ष, शुभम मुत्यलवार, गणेश मंथनवार, अमोल नामेवार, हिमांशु निकुरे, दर्शन कामडे, बंटी चटकेले यांच्या वतीने करण्यात आली या गंभीर समस्येची दखल घेऊन तात्काळ योग्य ती कार्यवाही करावी व नागरिकांना न्याय प्रदान करन्याची मागणी निवेदनातून करण्यात आली अन्यथा स्वराज्य स्वाभिमानी संघटना आपल्या पद्धतीने आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला.

Previous articleमुल येथे बेलदार समाजाची भवनची लीजवर नगर परिषदेकडे मागणी
Next articleआ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून मूल शहरात विकासाची गती रस्ते, नाल्या, समाजभवन ते कौशल्यविकास केंद्र,विविध कामांना वेग

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here