मूल तालूक्यातील गॅस सिलेंडर एजन्सी सुरू करून ग्राहकांना २५ दिवसात सिलेंडर द्यावे. प्रदेश सरचिटणीस संतोषसिंह रावत यांनी दिले जिल्हाधिकारी यांना निवेदन.

0
163

मूलः धानाची बाजारपेठ म्हणून परिचीत असलेल्या मूल तालुक्यात १०६ गावे व ४९ ग्रामपंचायती आणि १ नगर परिषद असून तालूक्याची लोकसंख्या दीड लाखाचे वर आहे. नगरात शासकीय कार्यालये, शिक्षण संस्था, उपजिल्हा रुग्नालय, औद्योगीक वसाहत, कृषी महाविद्यालय असून मूल तालूक्यात आजस्थितीत २५ हजाराचे वर गॅस वापरणारे कुटूंब आहेत. सिलेंडरसाठी ग्राहकांना धावपळ करावी लागत आहे.

ही गैरसोय लक्षात घेवून कंपनी प्रशासनाने मूल शहर आणि तालूक्यातील गॅस सिलींडर धारकांना सिलेंडर पुरवठा करण्याची जबाबदारी १२ कि. मी. अंतरावरील सावली आणि २२ कि.मी. अंतरावरील चिचपल्ली येथील गॅस एजन्सी कडे जबाबदारी सोपविलीआहे. अशी माहिती प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस, माजी जी. प. अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

परंतू सावली आणि चिचपल्ली येथील गॅस एजन्सी मूल शहर आणि तालूक्यातील गॅस सिलेंडर धारकांना नोंदणी करूनही वेळेवर उपलब्ध होत नसल्याने गृहिणींना चुलीवर स्वयंपाक करावा लागत आहे. त्यातही काड्यांची अडचण तसेच मूल शहरासाठी २५ दिवस व ग्रामीण साठी ४५ दिवसात गॅस सिलेंडर उपलब्ध करुन देण्यांत येईल असे सांगीतले जात आहे. परंतू फक्त महानगरपालीका शहरीकरणात येत असून मुल शहर हे ग्रामीण मध्येच येत असल्याने मूल शहरातील ग्राहकांना २५ दिवसात गॅस सिलेंडर देण्यांत यावे.

Previous articleविदर्भातील उद्योगांवर वीजदराबाबत अन्याय; हक्काचे ५५० कोटी द्या — आ. सुधीर मुनगंटीवार यांची विधानसभेत ठाम मागणी
Next articleमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचा रोहित कामडे अध्यक्ष पदी तर धर्मेंद्र सुत्रपवार सचिव म्हणून निवड..!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here