आमदार मुनगंटीवार यांनी दिलेला शब्द केला एक वर्षाच्या आत पूर्ण
मुल येथील प्रशासकीय भवनातील सभागृहाचे लोकार्पण आज दिनांक 24.04.2026 ला आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले, 2 मे 2025 ला सदर सभागृहात आढावा बैठक सुरू असताना इतका उकाडा जाणवला की उपस्थित जनता अक्षरशः होरपळून निघाली होती, सभागृहात बसने कठीण झाले होते , तेव्हा आमदार मुनगंटीवार यांनी लागलीच समस्त शेकडो जनतेसमोर सदर सभागृहाचे अद्यावतीकरण करण्यात येईल अशे जाहीर केले, फक्त जाहीर करून सोडून देतील तर ते मुनगंटीवार कसले, लागलीच जून 2025 ला 129.96 लक्ष रु मंजूर करत, प्रशासकीय मान्यता घेऊन एक वर्षाच्या आत अध्यावतीकरणं करवून घेत आज 24 एप्रिल ला लोकार्पण सुद्धा केले, नंतर सभागृहात आढावा बैठकीचे आयोजन करित जनतेच्या प्रश्नांचा आमदार मुनगंटीवार यांनी आढावा घेतला, प्रसंगी उपविभागीय अधिकारी अजय चरडे, तहसीलदार श्रीमती मृदुला मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी आमले, ठाणेदार विजय राठोड, उपविभागीय अभियंता बोदेले, क्रीडा अधिकारी विनोद ठिकरे, सर्व प्रशासकीय अधिकारी भाजप नेते नंदकिशोर रणदिवे, तालुका अध्यक्ष चंदू मारगोनवार, शहर अध्यक्ष प्रवीण मोहूर्ले, किरण कापगते, मनीषा गाडलेवार, नगरसेविका प्राची आक्केवार, अश्विनी निकोडे व सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.





