Mul:- नुकताच बारावीच्या बोर्डचा निकाल लागला असून मुल तालुक्यातील विद्यार्थ्यां कुठेही मागे न राहता दैदीप्यमान यश संपादन केले आहे,आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी यासाठी दिलेल्या सूचनेनुसार स्थानिक पदाधिकारी यांनी गुणवंत विद्यार्थी यांच्या घरी जाऊन परिवारासहित विद्यार्थी सत्कार करण्यात केला. ओम भारती सुनिल राखडे हा विद्यार्थी मुल तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावत 91.67 टक्के गुण संपादन केले, द्वितीय समृद्धी शिलवंत रामटेके 86.67 टक्के,तृतीय क्रमांक उत्कर्ष सतीश काळे 85.83 टक्के या सर्वांचा पालकासहित सत्कार करण्यात आला, आज भारतीय जनता पक्षातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी जाऊन पुष्पगुच्छ, भेटवस्तू आणि पेढे भरवत अभिष्टचिंतन करण्यात आले, भाजप मुल शहर अध्यक्ष प्रवीण मोहूर्ले, यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.त्यावेळी भाजप नेत्या प्रा किरण कापगते, महामंत्री डॉ.गुरु भंडारे,माजी नगरसेवक मिलिंद खोब्रागडे, नगरसेविका अश्विनी निकोडे, युवा मोर्चा शहर अध्यक्ष पंकज लाडवे,बबन गुंडावार,युवराज चावरे , विवेक मांदाडे, लीना बद्देलवार,गौतम जीवने, मनिषा राखडे ,सुनिल कुकुडकर,अपर्णा भेंडारे सह अनेक कार्यकर्त्याची उपस्थिती होती.
सत्कार मूर्तीच्या परिवाराने व परिसरातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला.





