मुल:- बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर होताच मुल तालुक्यातील विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. त्यात नवभारत कनिष्ठ महाविद्यालयातील जुळ्या बहिणी आकांशा बावणे आणि अक्षरा बावणे यांनी मिळवलेले यश विशेष कौतुकास्पद ठरले आहे.
आकांशा बावणे हिने 81.00% तर अक्षरा बावणे हिने 80.50% गुण मिळवत विज्ञान शाखेत उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
हलाकीच्या परिस्थितीतही न डगमगता, जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर त्यांनी हे यश संपादन केले आहे.
या यशामागे त्यांच्या वडिलांचे, श्री. संजय चिरंजीव बावणे (महसूल सेवक, तहसील कार्यालय मुल) यांचे कष्ट, त्याग आणि संस्कार यांचा मोठा वाटा आहे. वडिलांच्या संघर्षाची जाणीव ठेवत या दोन्ही मुलींनी आपल्या अभ्यासात सातत्य ठेवून हे यश मिळवले, ही गोष्ट खरोखर प्रेरणादायी आहे.
त्यांच्या या यशामुळे कुटुंबासह संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण पसरले आहे. अशा गुणवंत विद्यार्थिनींना मनःपूर्वक शुभेच्छा आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा!





