बेलगाव ग्रामस्थांचे पाण्यासाठी महिला चढली टॉवरवर 

0
12

( लखन केशवानी ) वरोरा तालुक्यातील बेलगाव येथे असलेल्या सनफ्लॅग कंपनी च्या भूमिगत कोळसा खाण उत्खननामुळे पाण्याची पातळी खालावली. त्यामुळे या गावात पाणी टंचाई निर्माण झाली. आता उन्हाळ्यात गावाला पाणी मिळावे याकरता सोमवारी ग्रामस्थांनी उपविभागीय कार्यालयात आंदोलन केले. यात एक महिला टॉवर वर चढल्याने खळबळ उडाली.

वरोरा तालुक्यात सनफ्लॅग कंपनीने भूमिगत कोळसा खाण केली. यामध्ये मोठ्या प्रमाणात कोळश्याचे उत्खनन करणे सुरू आहे. या उत्खननामुळे गावातील भूजल पातळी खोल गेली असून पाण्याचे सर्व स्त्रोत कोरडे पडलेले आहेत. विशेष म्हणजे गावातील नळ योजना ही बंद असल्याने गावात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली. ग्रामस्थांना पिण्याचे पाणीच मिळत नसल्याने त्यांनी अनेकदा ग्रामपंचायतसह प्रशासनाला निवेदन दिले. मात्र त्यावर काहीही तोडगा नाही निघाल्यामुळे अखेर सोमवारी ग्रामस्थांनी वरोरा उपविभागीय कार्यालयात आंदोलन केले. चर्चेतून काहीही तोडगा निघत नसल्याचे बघून कुसुम देवानंद वैद्य ही महिला उपविभागीय कार्यालयाच्या परिसरात असलेल्या टॉवर वर चढली आणि एकच खळबळ उडाली. यावेळी पोलीस प्रशासनाला प्राचारण करण्यात आले आणि त्यानंतर दिलेल्या आश्वासनानंतर अखेर महिला खाली उतरली.

या संदर्भात उपविभागीय कार्यालयात एक बैठक आयोजित करण्यात आली होती. यामध्ये सनफ्लॅग कंपनीच्या अधिकाऱ्यांसह इतर अधिकारी उपस्थित होते.

बेलगाव येथे पाण्याची पातळ

खोल गेल्यामुळे सनफ्लॅग कंपनी ला टँकरने पाणीपुरवठा करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. तसेच शासकीय निधीतून अतिरिक्त पाणीपुरवठा केला जाणार आहे. लवकरच भूजल पातळीचे तांत्रिक सर्वेक्षण होणार असून त्यावर कायम उपाय योजना केली जाईल

संदीप भस्के उपविभागीय अधिकारी वरोरा

Previous articleजुळ्या लेकीची यशस्वी भरारी.. परीक्षेत मिळवले दैदिप्यमान यश

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here