सार्वजनिक गाडगेबाबा जयंती उत्सवात साकारणार वीस फुटी गाडगेबाबांची प्रतिमा

0
173

यंदाचा समिती अध्यक्ष पदाचा बहुमान आमदार अमोल मिटकरी यांना..

मंगेश फरपट
व-हाड दूत न्यूज नेटवर्क 
अकोला- गत सतरा वर्षापासून धोबी परीट बहुभाषिक समाजातील सर्व जाती समूहांना एकत्र घेऊन सामाजिक विकास साधणाऱ्या सार्वजनिक गाडगेबाबा जयंती उत्सव समितीच्या वतीने यावर्षीही संत गाडगेबाबा यांचा जयंती उत्सव साजरा करण्यात येत आहे.यावर्षी करोना संकटाचे नियम बघता आगामी दिनांक 23 फेब्रुवारी रोजी स्वराज्य भवन प्रांगणात सकाळी 10 वाजता गाडगेबाबांचे वीस फुटी चित्र काढून त्या भोवती आकर्षक रांगोळी साकारून ही जयंती साजरी करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.स्थानीय शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत या उत्सवाची माहिती देण्यात आली. सार्वजनिक गाडगेबाबा जयंती उत्सव समितीचा अन्य विविध जाती जमातींना अध्यक्षपदाचा मान सातत्याने देण्यात येत असतो. या वर्षी समितीच्या अध्यक्षपदी सर्व जाती-जमातींना सोबत घेऊन विकास साधणारे आ.अमोलराव रामकृष्ण मिटकरी यांची निवड समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. तर कार्याध्यक्षपदी वैभव मानकर समितीचे कामकाज बघणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. दरवर्षी सार्वजनिक गाडगेबाबा जयंती उत्सव समितीच्या वतीने भव्य शोभायात्रा व विविध गर्दीचे उपक्रम राबविण्यात येतात. मात्र करोना संकट व शासनाचे निर्देश पाळून ही जयंती साध्या पद्धतीने साजरी करण्यात येणार आहे. ग्रामीण व शहरी भागातील नपा,मनपा,पस,जिप, ग्रामपंचायत सदस्य,पदाधिकारी व ग्रामीण शहरी नागरिकांनी आपापल्या घरी परिसरात गाडगेबाबांना विनम्र अभिवादन करून ही जयंती साजरी करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. सामाजिक अंतर राखून दिनांक 23 फेब्रुवारी रोजी स्वराज्य भवन प्रांगणात सकाळी 10 वाजता आयोजित या अप्रतिम वीस फुटी गाडगेबाबांच्या चित्राला अभिवादन करण्यासाठी नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन या वेळी करण्यात आले. या सोहळ्याची जय्यत तयारी समितीच्या वतीने सुरू करण्यात आली आहे.यावेळी समितीचे वैभव मानकर,जेष्ठ समाजसेवी वामनराव कवळे,रमेश थुकेकर,गोपीण्णा चाकर,हरीश बुंदेले आदी उपस्थित होते.हा सोहळा सफल करण्यासाठी आ.मिटकरी यांच्या मार्गदर्शनात
उल्हास मोकळकर,मनोज दुधांडे,चंद्रकांत थुकेकर,बंडू मोंडोकार,राजू मंजुळकर राजे चंदनबटवे,अनिल बुंदेले,राजू कनोजिया,कुंदन बुंदेले,कृष्णदास चांदुरकर,गणेश डहाके,प्रशांत मानकर, बंटी चाकर, अरविंद तायडे,शुभम डहाके,राहुल वरणकार,रवी अंदुरेकर,पुरुषोत्तम शिंदे,बाबुराव बेलुरकर,मंगेश केनेकर,ओम बुंदेले,गजानन वरणकार,सागर मोकळकर,मनिष कनोजिया,महेश पालकर,शिवा पवार,चेतन मानकर,रघु वानखडे,सुनील कौसकार,निपेश चहाकर,राजू चौधरी समवेत बहुसंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते मेहनत करीत आहेत,

Previous articleजलजीवन मिशन व स्वच्छ भारत मिशनअंतर्गतच्या कामांना गती देवून मार्च पूर्वी कामे प्राधान्याने पूर्ण करावीत- जिल्हाधिकारी निमा अरोरा यांचे आवाहन
Next articleबालकामगाराकडून हॉटेलवर काम करवून घेणा-या हॉटेल संचालकाविरुद्ध गुन्हा दाखल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here