जलजीवन मिशन व स्वच्छ भारत मिशनअंतर्गतच्या कामांना गती देवून मार्च पूर्वी कामे प्राधान्याने पूर्ण करावीत- जिल्हाधिकारी निमा अरोरा यांचे आवाहन

0
212

मंगेश फरपट 
व-हाड दूत न्यूज नेटवर्क 
अकोला: जल जीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन अंतर्गत कामांना गती देऊन मार्च 2022 पूर्वी कामे प्राधान्याने पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले आहे.
जिल्हा परिषदेच्या वतीने नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय अकोला येथे जल जिवन मिशन व स्वच्छ भारत मिशनअंतर्गत ग्रामसेवकांची आढावा सभा पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, निवासी उप जिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी विद्या पवार, जिल्हा ग्रामिम विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक सूरज गोहाड, जेजेएम प्रकल्प संचालक राजीव फडके, पंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब बोटे, महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विलास मरसाळे, कार्यकारी अभियंता संजय कावळे, गणेश रंभाड, मंगेश काळे, जिल्हा आरोग्य अधिकारी सुरेश आसोले, जिल्हा कृषी अधिकारी मुरलीधर इंगळे, शिक्षणाधिकारी प्राथमिक वैशाली ठग, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी गजानन दळवी, समाजकल्याण अधिकारी पुंड, पं.स चे गट विकास अधिकारी के आर तापी, राहुल शेळके, किशोर शिंदे, भारत चव्हाण, श्री. शुक्रे आदी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी गौण खनिज, वन तळे, शासकीय जागेवरील अतिक्रमण, स्मशानभूमी शेड, दिव्यांग यांचे प्रमाणपत्र, पाणी टंचाई या विषयाबाबत ग्रामसेवकांना सूचना दिल्या. तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार यांनी ग्रामसेवक हा ग्रामविकास मध्ये महत्वाचा घटक आहे. सरपंच यांचे सोबत गावामध्ये नेतृत्व तयार करण्याचे काम सोपे नाही, मात्र ग्रामसेवक यांनी मनावर घेतल्यास ग्रामविकास शक्य आहे, त्यामुळे सर्वांनी प्रामाणिकपणे योगदान द्या असेही आवाहन सौरभ कटीयार यांनी केले. अतिरिक्त  मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार यांनी  गावामध्ये पाणी पुरवठा योजना चे अवैध नळ जोडण्या असतील तर त्या वैद्य करण्याची मोहीम तात्काळ राबवा, अशी सूचना केली. यावेळी जिल्हा परिषद  मार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचे विभागप्रमुख यांनी सादरीकरण करण्यात आले. तर जिल्हाधिकारी कार्यालय यांचे मार्फत विविध विभागांचा आढावा सुध्दा घेण्यात आला. यावेळी सहायक गट विकास अधिकारी ,सर्व ग्रामसेवक, ग्राम विकास अधिकारी,मनरेगा प स चे सहायक कार्येक्रम अधिकारी,प स चे घरकुल अभियंता,जिल्हा तज्ञ, ISA संस्था प्रतिनिधी, सर्व शाखा अभियंता, अधिकारी /कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी ग्रामीण पाणीपुरवठा विभाग व जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनच्या अधिकारी कर्मचा-यांनी परिश्रम घेतले.
————–

Previous articleमोदी देशात सर्वात मोठे नौटंकीबाज- काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा आरोप
Next articleसार्वजनिक गाडगेबाबा जयंती उत्सवात साकारणार वीस फुटी गाडगेबाबांची प्रतिमा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here