अल्पवयीन मुलावर प्रेम करणा-या महिलेविरुद्ध लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल

0
226

वर्‍हाडदूत न्यूज नेटवर्क
अकोला एमआयडीसी पोलिस ठाण्याअंतर्गत घडलेल्या एका प्रकाराने चांगलीच खळबळ उडाली आहे. एका 29 वर्षिय महिलेविरुद्ध लैंगिक शोषणाचे प्रकरण दाखल करण्यात आले. या प्रकाराने अल्पवयीन मुलाचे कुटुंबाला धक्का बसला आहे.
याबाबत सविस्तर असे की, एका 29 वर्षिय विवाहितेला 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलावर प्रेम जडले. ही महिला 31 जानेवारीला अचानक घरून बेपत्ता झाली. त्याचवेळी अल्पवयीन मुलगाही दिसेनासा झाला. मुलाच्या आईवडिलांनी पोलिसात बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. या प्रकरणातील मुलगा खदान पोलिसांच्या हद्दीतील तर महिला एमआयडीसी पोलिसांच्या हद्दीत राहणारी आहे. संबंधीत महिलेचे पतीसोबत वाद झाल्याने ती कुंभारी येथे वेगळी राहात होती. तिची बहिण तसेच जावयाच्या मृत्युनंतर त्यांची मुलगी मावशीजवळ राहात होती. परंतु मावशीचे अल्पवयीन मुलावर प्रेम जडले. नऊ वर्षिय भाचीला एकटे सोडून तिने मुलासोबत पलायन केले. 10 दिवसानंतर मुलगा घरी आल्यावर त्याने सर्व हकीकत सांगितली. त्यानंतर महिलेविरुद्ध खदान पोलिस ठाण्यात लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Previous articleव्दितीय इतिहास परिषद व शिवशाहीच्या पाऊलखुणा पुस्तकाचे विमाेचन
Next article60 गावांची पाणीटंचाईपासून कायम मुक्तता होणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here