जिल्हयात मंगळवारी 17 कोरोना पॉझिटिव्ह, 53 जणांना डिस्चार्ज

0
200

वर्‍हाडदूत न्यूज नेटवर्क
अकोला :आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजे पर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 279 अहवाल प्राप्त झाले. त्यात 14 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. तर रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये तीन जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. असे एकूण 17 व्यक्तींचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. याशिवाय दिवसभरात 53 जणांना डिस्चार्ज देण्यात आला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 65,111 झाली आहे.
आजपर्यंत एकूण 367434 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 363319 फेरतपासणीचे 410 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 3705 नमुने होते. आजपर्यंत एकूण 367434 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 318310 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
आरटीपीसीआर १४ पॉझिटीव्ह
आज दिवसभरात आरटीपीसीआर चाचण्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अहवालात १४ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात नऊ पुरुष, पाच स्त्री रुग्ण आहेत. त्यातील सात अकोला शहरातील, तीन मुर्तिजापूर, तीन तेल्हारा व एक बार्शी टाकळी येथील रहिवासी आहेत,अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली. दिवसभरात होम आयसोलेशन येथून ५३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.
123 जणांवर उपचार सुरु
जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 65111 आहे. त्यात 1164 मृत झाले आहेत. तर 63824 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत 123 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.
रॅपिडमध्ये 128 चाचण्यात एक पॉझिटीव्ह
कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात दिवसभरात 128 चाचण्या झाल्या त्यात तिघांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

Previous articleबाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प
Next article” लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी “…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here