वर्हाड दूत न्यूज नेटवर्क
अकोला :महाविकास आघाडी शासनातील मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेचा अकोला राष्ट्रवादी काँग्रेसकडून आज २४ फेब्रुवारीरोजी निषेध करण्यात आला. अकोला शहरातील धिंग्रा चौकात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे नेते तथा मंत्री नवाब मलिक यांच्या समर्थनार्थ आंदोलन केले.
आमदार अमोल मिटकरी, महानगर अध्यक्ष विजय देशमुख, प्रदेश संघटक मो. रफीक सिद्दीकी यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रवादी युवक अध्यक्ष अजय मते यांच्या पुढाकारात हे आंदोलन झाले. केंद्र शासनाच्या इशा-यावर ईडी कार्यालय काम करत आहे. त्याच्या विरोधात धिंग्रा चौकात आंदोलन केले. याप्रसंगी नगरसेवक फैयाज खान, अब्दुल रहिम पेंटर, दिलीप देशमुख, संतोष डाबेराव,देवानंद ताले, बुढन गाडेकर, अब्दुल अनिस,संदीप तायडे,यश सवाल, सुषमा निचळ, मंदा देशमुख, सरला वरघट,याकूब पहेलवान,मो. फिरोज, सैयद वसिम, शुभम पिठलोड, पृथ्वीराज गावंडे, हुसेन चौधरी, सोनु पठान, मुन्ना ठाकुर, अजय कांबळे, गजानन मुरुमकर यांच्यासह राकाँ पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.





