वर्हाडदूत न्यूज नेटवर्क
अकोला :भीम नगर परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असून मैदानाच्या प्रलंबित समस्या साठी आपण शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन आमदार अमोल मिटकरी यांनी दिले.
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर मैदान वाचवण्यासाठी दि,20 व 21/02/22 रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर मैदान ,येथे अकोला शहर वासी तसेच हजारो क्रीडाप्रेमींनी या जण स्वाक्षरी अभियानात स्वयंस्फूर्तीने हजेरी लावत आपले स्वाक्षरी व अभिप्राय नोंदविला
जुन्या शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर मैदानाची अति दुरावस्था झालेली असून एके काळी क्रीडाप्रेमी चें माहेर घर असलेल्या या मैदानात अक्षरशः घाणी चे साम्राज्य पसरलेले आहे. या बाबत महापालिका आयुक्त अकोला यांच्या कडेच न्हवे तर अकोल्याच्या सर्व पक्षीय नेत्यांना मैदानाच्या विकासासाठी वारंवार साकडं व निवेदन देण्यात आली, मात्र शासन प्रशासनाणे अध्यापही दखल घेतली नसल्याने हे अभियान यांना जाग आनण्याकरिता राबविण्यात आलेय.
आबेडकर मैदानात गेल्या दोन महिन्यांपासून पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन लिकेज होऊन मैदान अक्षरशः तलावसारखे दिसल्याचे चित्र दिसत आहे.
आबेडकर मैदानात राजकिय पुढाऱ्यांनी फक्त आपल्या राजकीय सभा घेउन आपला हेतू साध्य केला मात्र या मैदानाच्या विकासासाठी कुणीही पुढे आले नसल्याची शोकांतिका आहे.
आज या स्वराक्षरी अभियानाला आमदार मिटकरी यांनी भेट देत मैदानाची दूरव्यवस्था पाहून क्रीडा अधिकारी यांच्या कार्यकर्त्यांना सपाटीकरण करण्याचं कोटेशन मागितले असून येणाऱ्या14एप्रिलच्या आधी मैदान दुरुस्ती करण्यात येणार असल्याची ग्वाही दिली असून येणाऱ्या14 एप्रिलपर्यंत मैदानाची दुरुस्ती झाली नाही तर क्रीडा प्रेमी व येथील नागरिक तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा शासन प्रशासनाला दिला आहे.
यावेळी आशुतोष शेगोकार (सामाजिक कार्यकर्ता)आकाश शिरसाट ,पंकज इंगोले ,आशिष शिरसाट , किरण शिरसाट, पवन शिरसाट, आदित्य अंभोरे , सौरभ शिरसाट , अक्षय शिरसाट ,सनी शिरसाठ,अमोल शिरसाट, सुधीर शेगोकार, सागर इंगळे, पप्पू बनसोडे, बाळासाहेब इंगळे ,सागर खंडारे, श्रीकांत सुरवाडे सर ,प्रभाकर शिरसाट, गुरुजी सतीश धांडे, अशोक तेलगोटे, प्रमोद तायडे , पिंटू टोबरे ,बंडू सरदार ,अनिरुद्ध तेलगोटे ,नागेश तेलगोटे ,अक्षय वानखडे ,शुभम खरात ,सनी शेगोकार, सचिन भोजने, सुबोध पळसपगार,राजू आठवले ,दिनेश शिरसाठ, संदीप जंजाळ, सुमित पाटील , प्रमोद बनसोडे, आदित्य अंभोरे ,निखिल शिरसाट, बंटी सावंत, सनी शिरसाट, अजय डोंगरे, योगेश गोपनारायण, योगेश शेगोकार, सचिन भोजने धरम भोजने, रोशन शिरसाठ, दिनेश शिरसाट, संपू शिरसाट, संग्राम शिरसाट ,सनी वानखडे ,मनोज शिरसाट , राहुल शेगोकार.जुने शहर वासी उपस्थित होते.





