अकोला–जिल्हा वार्षिक योजनाअंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभाग व जागतिक बँक प्रकल्पअंतर्गत निर्माणधीन कुटासा येथील पुलाच्या कामाची पाहणी राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी आज केली. कुटासा येथील निर्माणधीन पुल भामोद, लोतवाडा, इसापूर व पिंपळोद या ग्रामीण भागाला जोडणारा मुख्य रस्ता असून यामुळे चार हजार एकर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना मदत होणार आहे, असे त्यांनी पाहणी दरम्यान सांगितले.





