15 मार्च ते 25 मार्च पर्यंत भाजपाचे घर घर चलो अभियान

0
247

जनतेने दिलेल्या जबाबदारीचा लेखाजोगा मांडल्या जाणार
भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांची माहिती 
व-हाड दूत न्यूज नेटवर्क 

अकोला: जनतेने टाकलेला विश्वास सार्थ करण्यात भारतीय जनता पक्ष यशस्वी ठरला असून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भरघोस निधी दिल्यामुळे अकोला महानगर व नगरपालिका क्षेत्राचा विकास झाला जनताजनार्दन नगरपालिका आणि महानगरपालिकेत पुन्हा भारतीय जनता पक्षावर विश्वास टाकणार जनतेने दिलेल्या जबाबदारीचा लेखाजोखा 12 मार्चपर्यंत जनतेला सादरीकरण करून 15 मार्च ते 25 मार्च पर्यंत घर घर चलो अभियान राबवण्यात येईल तशी घोषणा जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांनी केली.
भारतीय जनता पक्षाची नगरपालिका व महानगरपालिका निवडणूक संदर्भात कोर कमिटी च्या बैठकीत घोषणा केली बैठकीच्या अध्यक्षस्थानी महानगराध्यक्ष विजय अग्रवाल हे होते तर संघटनमंत्री उपेंद्र कोठेकर संघटन मंत्री सुनील कर्जतकर,आमदार गोवर्धन शर्मा आमदार हरीश पिंपळे आमदार प्रकाश भारसाकळे आमदार वसंत खंडेलवाल तेजराव थोरात महापौर अर्चनाताई मसने, किशोर पाटील, माधव मानकर अक्षय गंगाखेडकर, संजय गोडा, संजय गोडफोडे, श्रावण इंगळे जयश्री फुंडकर हरिनारायण माकोडे , मोनाली ताई गावंडे, राजू उगले आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
अकोला महानगरपालिका निवडणूक प्रमुख जबाबदारी आमदार रणधीर सावरकर यांच्यावर सोपवण्यात आले ची माहिती संघटन मंत्री उपेंद्र कोठेकर यांनी यांनी दिली महानगरपालिका आणि नगरपालिका वर सध्याच्या राजकीय परिस्थिती संदर्भात आढावा संघटन मंत्री डॉक्टर उपेंद्र कोठेकर, सुनील कर्जतकर यांनी घेऊन मार्गदर्शन केले ‌ महानगराध्यक्ष विजय अग्रवाल यांनीप्रास्ताविक करून अकोला महानगर पालिकेने केलेल्या कामकाजाचा आढावा प्रस्तुत केला त्यावेळी मंडळातील पदाधिकारी अध्यक्ष यांनीसुद्धा आपली मते मांडली कार्यक्रमाचे संचालन एडवोकेट देवाशीष काकड तर आभार प्रदर्शन आमदार गोवर्धन शर्मा यांनी केले यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते त्या वेळी आमदार रणधीर सावरकर यांचे स्वागत करण्यात आले.

Previous articleमहानगरात निघाली मुनींश्री विशेषसागरजी यांची भव्य शोभायात्रा
Next articleकुटासा येथील पुलाच्या कामाची पालकमंत्र्यांकडून पाहणी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here