भाजपा विधीमंडळ पक्षाच्या प्रतोदपदी अकोल्याचे आमदार रणधीर सावरकर

0
163

व-हाड दूत न्यूज नेटवर्क 
अकोला: भारतीय जनता पार्टी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाकरिता विधिमंडळ पक्ष कार्यालयात विद्यमान मुख्य-प्रतोद व प्रतोद यांना सहाय्य करण्यासाठी आमदार रणधीर सावरकर यांची प्रतोद म्हणून नियुक्ती केली आहे.
कोला महानगरपालिका प्रभारी नियुक्तीनंतर अकोला जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी प्रतोद म्हणून सोपवून अकोला जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचा व अकोल्यात जिल्ह्याच्या मतदारांचा सन्मान केला आहे. या बद्दल प्रदेश भाजपाध्यक्ष चंद्रकांत पाटील तसेच विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे आभार आमदार गोवर्धन शर्मा, आमदार हरीश पिंपळे, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार वसंत खंडेलवाल, महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल, महापौर अर्चना मसने, तेजराव थोरात यांनी मानले.

Previous articleरस्त्यावर उभ्या ट्रकवर दुचाकी आदळली, एकाचा मृत्यू
Next articleमहाबीजमध्ये बोगस भरती, ११ अधिकारी – कर्मचा-यांवर बरखास्तीची कारवाई

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here