अकोटचे मावळे निघाले, पन्हाळा ते पावनखिंड मोहिमेवर

0
165

व-हाड दूत न्यूज नेटवर्क 
अकोला: पन्हाळ्याच्या कैदेतून छत्रपती शिवरायांची सुटका करण्यासाठी दोन शूरवीर मृत्यूला सामोरे गेले. त्यांच्या  बलिदानामुळे महाराज वाचले आणि स्वराज्य निर्धोक झाले. ते शिवरायांचे जिवलग होते वीर शिवा काशिद आणि वीर बाजी प्रभू देशपांडे. त्यांना नमन करण्यासाठी येथील मावळे पन्हाळा ते पावनखिंड मोहिमेसाठी निघाले आहेत.
खडतर प्रवास,नद्या नाले,डोंगर, जंगलातून वाट काढत ज्या वाटेने महाराज मावळ्यांसोबत गेले,त्याच वाटेने हे मावळे सत्तेचाळीस किलोमीटरचा प्रवास दोन दिवसात पूर्ण करून पावनखिंड गाठतील. शिवतीर्थ प्रतिष्ठान अकोटचे इतिहास प्रेमी शिक्षक कोल्हापूरला जावून पन्हाळा ते पावनखिंड पायी प्रवास करतात. मोहिमेत प्रवीण सिरस्कार, रत्नाकर रेळे,संदीप सावरकर, अमोल आगे, विष्णू झामरे, नीलकंठ म्हैसने, अमर भागवत, मनोज लोडम, मनोज रतन, बंडू उकर्डे, सुरेन्द्र दिवणाले, श्याम अनकुरकर, अनंत नहाटे, विठ्ठल सांगुनवेढे, विनोद तळोकार, गोपाल भोरखडे, कोल्हापूर हायकर्सचे सागर पाटील सहभागी आहेत. 16 जुलैला पन्हाळा येथून मार्गस्थ होतील व 17 जुलैला संध्याकाळी पावनखिंडीत पोहोचतील असे संतोष झामरे यांनी कळवले आहे.

Previous articleप्रत्येक महिण्याच्या दुसऱ्या सोमवारी ‘संवाद दिन’
Next articleगर्भवती महिेलेला पूरातून पोहचवले दवाखान्यात ; संत गाडगेबाबा आपतकालीन शोध व बचाव पथक बनले देवदूत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here